Vidhan Sabha Election 2024 Raigad District Update: रायगड जिल्ह्यामधील विधानसभा मतदारसंघांमध्ये शेकापसह शिवसेना उद्धव ठाकरे गटाचा सुपडा साफ झाल्याचे चित्र पाहायला मिळाले.
हायलाइट्स:
- रायगड जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचे निकाल
- महायुतीच्या उमेदवारांची बाजी
- विद्यमान आमदारांनी राखले गड
‘संजय उगाचच…’ मोजक्याच शब्दात परेश रावल यांचा राऊतांना टोला; ठाकरे गटाच्या दुर्दशेनंतर केलं ट्वीट
महाविकास आघाडीमध्ये अलिबागची जागा शिवसेनेने शेकापला देण्यास विरोध केला होता, त्यानंतर शेकाप सरचिटणीस जयंत पाटील यांनी अलिबाग मतदार संघातून त्यांच्या सूनबाई चित्रलेखा पाटील यांना उमेदवारी जाहीर केलेली. त्यामुळे शेकापसाठी ही लढाई प्रतिष्ठेचीच होती. आता शिंदे गटाचे आमदार महेंद्र दळवी यांनी दुसऱ्यांदा या मतदारसंघातून विजय मिळविला. त्यामुळे अलिबाग मतदारसंघात सलग दोनवेळा जिंकण्याचा शेकापचा रेकॉर्डही महेंद्र दळवी यांनी मोडला आहे. या मतदारसंघात भाजपमधून बंडखोरी करुन अपक्ष अर्ज भरणाऱ्या दिलीप भोईर यांना ३३ हजार २१० मते मिळाली आहेत. अलिबाग हे जिल्ह्याचे मुख्यालय आहे, तसेच अलिबाग तालुक्यात अद्याप मंत्रिपद मिळालेले नाही आणि ते आता मिळेल असा आशावाज दळवी यांनी निवडून आल्यानंतर व्यक्त केला.
जिल्ह्यातील आणखी एक महत्त्वाचा मतदारसंघ मानल्या जाणऱ्या श्रीवर्धनमध्ये सर्व विक्रम मोडीत काढत राष्ट्रवादी काँग्रेसच्या आदिती तटकरे यांनी ८२ हजार ७९८ मतांची दणदणीत विजय मिळवला. या मतदारसंघातून अदिती यांना १ लाख १६ हजार ५० मते मिळाली. तर त्यांच्या विरोधातील महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अनिल नवगणे यांना ३३ हजार २५२ मते मिळाली. यावेळी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने नवगणेंना उमेदवारी देऊन तेथील कुणबी मतांना साद घालण्याचा प्रयत्न केला असला तरी जरांगे फॅक्टर इथे चालला नसल्याचे बोलले जातेय.
Vidhan Sabha Nivadnuk 2024 Result: कोकण किनारपट्टीवर महायुतीचं वादळ! उद्धव ठाकरे गट जवळपास संपला; ३ जिल्ह्यात मिळून एकच उमेदवार विजयी
दरम्यान पेण विधानसभा मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार रविशेठ पाटील यांचा ६० हजार ६७७ मतांनी विजय झाला आहे. यामुळे भाजपने या मतदारसंघातील आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. रवींद्र पाटील यांना १ लाख २४ हजार ६३१ मते मिळाली, तर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या प्रसाद भोईर यांना ६३ हजार ८२१ मते मिळाली आहेत. या मतदारसंघात शेकापच्या अतुल म्हात्रे यांना २९ हजार १९१ मते मिळून ते तिसऱ्या क्रमांकावर गेले आहेत. पेण मतदारसंघात असणारे शेकापचे वर्चस्व खासदार धैर्यशील पाटील भाजपमध्ये आल्यानंतर कमी झाला असल्याचे दिसून येते. तर दुसरीकडे शिवसेनेला मिळालेल्या मतांचा विचार केला असता याठिकाणी शिवसेना जोर धरत असल्याचे चित्र आहे.
महाड मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे विद्यमान आमदार भरत गोगावले यांनी चौथ्यांदा निवडून येऊन विजयाचा चौकार लगावला आहे. गोगावले २६ हजार २१० मतांनी विजयी झाले. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या स्नेहल जगताप यांचा पराभव केला. जगतापांना ९१ हजार २३२ मते मिळाली तर गोगावले यांना १ लाख १७ हजार ४४२ मते मिळाली आहेत. माजी आमदार माणिक जगताप यांच्या कन्या असलेल्या स्नेहल जगताप यांनी गोगावलेंना चांगली झुंज दिली.