• Sun. Nov 17th, 2024
    जम्मू काश्मीरमधील 9 जणांना आहिल्यानगरमधून अटक

    नगरमध्ये बनावट बंदूक परवाना घेऊन सुरक्षारक्षक म्हणून काम करणाऱ्या जम्मू काश्मीरमधील 9 जणांना अटक करण्यात आली आहे. मिलिटरी इंटेलिजन्स आणि तोफखाना पोलिसांनी संयुक्त कारवाईत करण्यात आली. 56 काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. आरोपी हे सर्व राजौरी जिल्ह्यातील असून खोट्या कागदपत्रांवर नोकरी करत होते. पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आलीये.

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    नगर : नुकताच पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आलीये. सुरक्षारक्षक म्हणून नोकरीसाठी बनावट बंदूक परवाना घेऊन नोकरी करणाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आलीये. हेच नाही तर आता याप्रकरणी पोलिसांनी नऊ जणांना अटकही केलीये. जम्मू कश्मीर येथील 9 जणांना मिलिटरी इंटेलिजन्स आणि अहिल्यानगरच्या तोफखाना पोलिसांनी अटक केली आहे. हे 9 जण जम्मू काश्मीरचे रहिवासी असल्याचे स्पष्ट झालंय. जम्मू काश्मीर येथील राजौरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून बंदूक परवाण्याची माहिती मागविण्यात आली होती.

    राजौरी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून आलेल्या माहितीनंतर हे स्पष्ट झाले की, या 9 जणांकडे असलेली शस्त्रपरवाने बनावट आहेत. त्यानंतर पोलिसांनी लगेचच 9 जणांना अटक केली. यांच्याकडून 12 बोअर, 9 रायफल आणि 58 काडतूसे जप्त करण्यात आली आहेत. यामधील सर्वजण हे जम्मू काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले आहे.
    लॉरेन्स बिश्नोईच्या हिट लिस्टवर बिग बॉस विजेता मुनव्वर फारूकी, ‘तो’ मोठा खुलासाजम्मू काश्मीरमधील हे 9 जण नगर जिल्ह्यात खोट्या कागदपत्राच्या आधारे सुरक्षारक्षक म्हणून काम करत असल्याची मोठी माहिती मिलिटरी इंटेलिजन्स यांना मिळाली होती. त्यानुसार तोफखाना पोलीस यांच्या मदतीने ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आर्म एक्टसह गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस याप्रकरणी पुढील तपास करत आहेत.

    जम्मू काश्मीरमधील 9 जणांना नगरमधून अटक, पोलिसांकडून मोठी कारवाई

    पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी याप्रकरणाबद्दल अधिक माहिती दिलीये. या घटनेनंतर मोठी खळबळ निर्माण झालीये. पोलिसांकडून ही मोठी कारवाई बनावट बंदूक परवाना घेऊन नोकरी करणाऱ्यांवर करण्यात आलीये. आता चाैकशीमध्ये हे नऊ जण काय खुलासा करतात हे देखील पाहण्यासारखे ठरणार आहे. काही मोठे खुलासे होऊ शकतात, अशी देखील चर्चा रंगताना दिसतंय.

    शितल मुंढे

    लेखकाबद्दलशितल मुंढेमहाराष्ट्र टाइम्स ऑनलाईन टीममध्ये सिनिअर डिजिटल कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत. राजकीय, मनोरंजन, शिक्षण आणि क्राईम बातम्यांमध्ये विशेष आवड. लोकमत आणि टीव्ही 9 मराठीसह पत्रकारिता क्षेत्रात 6 वर्षांचा अनुभव…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *