• Sun. Nov 17th, 2024
    ‘वंचित’च्या उमेदवाराला पक्षातील नेत्यांनीच काळं फासलं, नंतर चाबकाने फटकावलं

    Beed Vanchit Leader Beaten: अपक्ष उमेदवार सचिन भीमराव चव्हाण यांनी सुरुवातीला वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला होता. मात्र त्यांनी हा पाठिंबा काढून घेत आता भाजपला पाठिंबा दिला आहे.

    हायलाइट्स:

    • आधी काळं फासलं मग चाबकाने फटकावलं
    • वंचितच्या कार्यकर्त्यांनी नेत्याला मारलं
    • बीडमधील धक्कादायक घटना
    महाराष्ट्र टाइम्स.कॉम
    वंचित बहुजन आघाडी सचिन चव्हाण मारहाण

    बीड : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवाराला काळे फासत मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वंचितला पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराने भाजपला पाठिंबा दिल्याने वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.वंचित बहुजन आघाडीचे शैलेश कांबळे यांनी अपक्ष उमेदवार सचिन चव्हाण यांना काळे फासत मारहाण करण्यात आली आहे. सचिन चव्हाण यांना काळे फासत शैलेश कांबळे म्हणाले, ”सचिन चव्हाण यांनी जो काही प्रकार केला आहे याचा आम्ही निषेध करतो. बाळासाहेब आंबेडकरांना धोका या सचिन चव्हाण याने दिला आहे”, असे म्हणत शैलेश कांबळे यांनी चाबकाने मारहाण केली आहे.
    लॉरेन्स बिश्नोईच्या हिट लिस्टवर बिग बॉस विजेता मुनव्वर फारूकी, ‘तो’ मोठा खुलासा

    अपक्ष उमेदवार सचिन भीमराव चव्हाण यांनी सुरुवातीला वंचित बहुजन आघाडीला विधानसभा निवडणुकीसाठी पाठिंबा जाहीर केला होता. मात्र त्यांनी हा पाठिंबा काढून घेत आता भाजपला पाठिंबा दिला आहे. त्यांच्या या बदललेल्या भूमिकेमुळे वंचितचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यातून शैलेश कांबळे यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत सचिन चव्हाण यांच्या तोंडाला काळे फासले. तसेच बाळासाहेब आंबेडकरांना धोका दिला म्हणत त्यांनी सचिन चव्हाण यांना चाबकाने फटके मारले असल्याचे समोर आले आहे.

    विधानसभा निवडणूक आता काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. राज्यातील सर्वच भागांमध्ये राजकीय पक्षांकडून उमेदवाराच्या प्रचारासाठी सभा आयोजित करण्यात येत आहेत. तसेच इतर पक्षांकडून व अपक्ष उमेदवारांकडून देखील पाठिंबा मिळवण्यासाठी महायुती आणि महाविकास आघाडी प्रयत्न करत आहे. तसेच निवडणुकीच्या रिंगणात आता तिसरी आघाडीने देखील उडी घेतली आहे. आमदार बच्चू कडू, छत्रपती संभाजीराजे व राजू शेट्टी यांनी मिळून तिसरी आघाडी स्थापन केली आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीचा निकाल काय लागणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *