BJP Internal Survey: विविध संस्थांप्रमाणेच राजकीय पक्षांकडूनही निवडणूक काळात सर्व्हे केले जातात. त्यानुसार पुढील रणनीती आखली जाते. पक्षांतर्गत सर्व्हेचे आकडे सांगताना विनोद तावडेंनी महायुतीला बहुमत मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला.
विविध संस्थांप्रमाणेच पक्षांकडूनही सर्व्हे केले जातात. त्यानुसार पुढील रणनीती आखली जाते. पक्षांतर्गत सर्व्हेचे आकडे सांगताना विनोद तावडेंनी महायुतीला बहुमत मिळेल, असा ठाम विश्वास व्यक्त केला. ‘आमच्या सर्व्हेनुसार विधानसभा निवडणुकीत भाजपला ९५ ते ११० जागा मिळू शकतात. शिवसेनेला ४० ते ५० आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला २५ ते ३० जागा मिळण्याची शक्यता आहे. महायुतीला १६५ जागांपर्यंत मजल मारेल,’ असा दावा तावडेंनी केला.
हमारा निशाना सिर्फ महाराष्ट्र नहीं! मविआला पाठिंबा देणाऱ्या नोमानींचा VIDEO शेलारांकडून शेअर
विनोद तावडेंनी सांगितलेले आकडे पाहता महायुतीत भाजप आणि शिवसेना त्यांच्या आमदारांची संख्या कायम राखताना दिसत आहे. गेल्या निवडणुकीत भाजपनं १०५ जागांवर विजय मिळवला होता. भाजपच राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरलेला होता. आताही भाजपला जवळपास तितक्याच जागा मिळतील, असं भाजपचा सर्व्हे सांगतो.
२०१९ मध्ये एकसंध असलेल्या शिवसेनेला ५६ जागांवर यश मिळालं होतं. २०२२ मध्ये शिवसेनेत फूट पडली. एकनाथ शिंदेंनी केलेल्या बंडाला ४० आमदारांनी साथ दिली. काही अपक्ष आमदारदेखील त्यांच्या सोबत होते. काही अपक्ष आमदारांनी गेल्या काही महिन्यांत शिंदेसेनेची वाट धरली. तावडेंनी शिवसेनेला ४० ते ५० जागा मिळतील असा अंदाज वर्तवला आहे. म्हणजे शिंदेसेना आमदारांचा आकडा कायम राखताना दिसत आहे. त्यामुळे निकालानंतर शिंदे त्यांची ‘पॉवर’ कायम राखू शकतात.
Devendra Fadnavis: ‘त्या’ मुद्द्यावर अजित पवारांसोबत १०० टक्के मतभेद! मतदानाच्या तोंडावर फडणवीस स्पष्टच बोलले
महायुतीत गेलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मात्र फटका बसेल असं भाजपचा सर्व्हे सांगतो. अजित पवारांसोबत जवळपास ४० आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली. यानंतर गेल्या काही दिवसांमध्ये काँग्रेसचे काही विद्यमान आमदार अजित पवारांच्या पक्षात गेले. पण भाजपच्या सर्व्हेनुसार अजित पवारांच्या राष्ट्रवादीला २५ ते ३० जागा मिळू शकतात. त्यामुळे अजित पवारांचं नुकसान होत असल्याचं आकडेवारीतून दिसत आहे.