• Sat. Nov 16th, 2024
    यावेळी व्याजासह षटकार मारणार, गोगावलेंच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंच्या लाडक्या बहिणीने कंबर कसली

    Mahad Vidhan Sabha: गोगावले चौकार मारणार, चौकार मारणार असे या निवडणुकीत वारंवार सांगितले जात आहे. पण मी स्नेहल जगताप यावेळी षटकार मारणार आणि तोही व्याजासह मारणार, असा हुंकारच महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवार स्नेहल जगताप यांनी केला आहे.

    Lipi

    अमुलकुमार जैन, रायगड : गोगावले चौकार मारणार, चौकार मारणार असे या निवडणुकीत वारंवार सांगितले जात आहे. पण मी स्नेहल जगताप यावेळी षटकार मारणार आणि तोही व्याजासह मारणार, असा हुंकारच महाविकास आघाडीतील शिवसेना ठाकरे पक्षाच्या उमेदवार स्नेहल जगताप यांनी केला आहे. त्या पोलादपूर येथील सभेप्रसंगी बोलत होता. यावेळी त्यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार आमदार गोगावले यांना इशारा दिला आहे. तसेच यावेळी डॉ. नितीन बानगुडे पाटील यांनी देखील महायुतीवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, लाडक्या बहि‍णीच्या पंधराशे रूपयांपेक्षा जाहिरातीवर जास्त खर्च करण्यात आल्याने राज्यावर ९०० कोटींचे कर्ज करून ठेवले आहे. जन्माला येणाऱ्या प्रत्येकाच्या डोक्यावर कर्जाचा बोजा आहे, असे असेल तर हे सरकार काय कामाचे, यांना हद्दपार केलेच पाहिजे, असे बानगुडे पाटील म्हणाले.

    महाविकास आघाडीच्या स्नेहल जगताप यांच्या प्रचारार्थ पोलादपूर येथे डॉ.नितीन बानगुडे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत सभा पार पडली. याप्रसंगी रायगड दक्षिण जिल्हा संपर्कप्रमुख नागेंद्र राठोड, जिल्हा प्रवत्तेफ् धनंजय देशमुख, सहसंपर्कप्रमुख बाळकृष्ण राऊळ, माजी सभापती दिलीप भागवत आदी उपस्थित होते.

    सभेदरम्यान स्नेहल जगताप यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार भरत गोगावलेंना थेट इशारा दिला आहे. ‘स्नेहल जगतापला कमी लेखू नका. या स्नेहलमुळेच गोगावले कुटूंबाला रस्त्यावर उतरून प्रचार करावा लागत आहे, यातच माझा विजय आहे. येणाऱ्या २३ नोव्हेंबरला गुलाल माझाच असणार.’ असे म्हणत ‘तुम्ही विकास केला सांगताय मात्र, आजही तुम्ही गावागावात विकास करण्यासाठी एक संधी द्या असे का सांगता. तुमचा विकास फलकावर आणि तुमच्या घरात झाला आहे. औद्योगिक वसाहतीमधील थर्ड पार्टीमधील तरुणांच्या पगाराच्या कमिशनवर तुमचा धंदा चालत आहे. तो आम्ही मोडीत काढणार. या मतदारसंघात ना १५ वर्षे नवीन कारखाने आले ना दर्जेदार शिक्षण संस्था आली. तसेच आरोग्याचा प्रश्नही सुटला नाही मग तुम्ही काय विकास केलात, असा सवाल देखील स्नेहल जगतापांनी उपस्थित केला.
    देवेंद्र फडणवीस आता कधीच मुख्यमंत्री…, आदित्य ठाकरेंचा मोठा दावा
    खरंतर अंतर्गत गटारे, रस्ते ही कामे तर ग्रामपंचायतीचा सदस्यही करतो, आमदार म्हणजे जनता व राज्यशासन याच्या मधील दुवा आहे. मात्र, या मतदारसंघात भलतेच घडले आहे. दुवा सोडा, गुंडगिरी दडपशाही करीत आहेत. तुमच्या डोक्यावर त्यावेळी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा हात होता म्हणून तुम्ही निवडून येत होता. आता तोच हात स्नेहल जगतापच्या डोक्यावर आहे तुम्ही कसे निवडून येणार? येथील जनता तुमचा पराभव करणार, असे म्हणत स्नेहल जगतापांनी सभा गाजवली आहे

    डॉ. नितीन बानगुडे पाटील यांनी राज्यसरकारचा जोरदार समाचार घेताना मतदारसंघातील अनेक जि.प. शाळा बंद पडत आहेत. ते का तर चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता दिल्याने. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राज्यातील एकही प्रकल्प राज्याबाहेर गेला नाही. मुख्यमंत्री पदावरून पायउतार होऊन वर्षा बंगला सोडला तेव्हा हे ४० खोकेबहाद्दर टेबलावर नाचून महाराष्ट्र पायधुळीस मिळवत होते, असा घणाघात स्नेहल जगतापांनी केला आहे.

    युती सरकारच्या काळात साडेतीन वर्षाच्या मुलीवर बलात्कार होतो. मराठयांवर आणि वारकऱ्यांवर लाठीहल्ला होतो, तरी सरकार गप्प बसते. याला जबाबदार मुख्यमंत्री व त्याचे ३९ गद्दार साथीदार आहेत. यांना मातीत गाडण्यासाठी पुन्हा उध्दव बाळासाहेब ठाकरे यांना सत्तेत आणायचे आहे, असेही जगताप म्हणाल्या.

    विमल पाटील

    लेखकाबद्दलविमल पाटीलविमल पाटील, महाराष्ट्र टाइम्स ऑनलाईनमध्ये कंसल्टंट म्हणून कार्यरत आहे. याआधी सामना, आरएनओ वृत्तसंस्थेमध्ये रिपोर्टर म्हणून काम केलं आहे. पत्रकारिता क्षेत्रात तीन वर्षांचा अनुभव आहे. राजकीय आणि विश्लेषणात्मक बातम्या लिहण्याची आवड…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed