Sharad Pawar: शरद पवारांची २०१९ साली साताऱ्यात झालेल्या पावसातील सभेची आठवण पुन्हा एकदा सर्वांना झाली. आज इचलकरंजीत पवारांच्या सभेच्यावेळी पाऊस झाला. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला.
भर पावसात झालेल्या सभेत शरद पवारांनी सांगितले की, राज्यात अनेक वेळा बोलायला उभा राहिलो तेव्हा पावसाला सुरूवात आणि अशाच पद्धतीने निवडणुकीचा निकाल देखील चांगला लागतो. राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत सत्ता कोणाच्या हातात द्यायचा हा निर्णय घ्याचा आहे. सध्या ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांचा अनुभव काही चांगला नाही. त्यामुळे २० तारखेला महाविकास आघाडीच्या उमेदवारांना विजय करा, असे आवाहन त्यांनी केले. या सभेत शरद पवार फार बोलले नसले तरी जेव्हा ते बोलण्यास उभे राहिले तेव्हा उपस्थित कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष केला.
राज्यातील १६३ मतदारसंघात अपक्ष उमेदवारांना पिपाणी चिन्ह दिले; सुप्रिया सुळेंचा भाजपवर रडीचा डाव खेळल्याचा आरोप
त्याआधी शरद पवारांनी सांगलीत रोहित पाटील यांच्यासाठी सभा घेतली. राज्यघटना बदलण्यासाठी भाजपला ४०० जागा हव्या होत्या. पण आम्ही तो प्रयत्न लोकसभा निवडणुकीत यशस्वी होऊ दिला नाही. आता विधानसभेच्या निवडणुकीत काही वाटेल ते झाले तरी देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता जाऊ द्यायची नाही हे आम्ही ठरवले आहे. त्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. आम्ही फक्त त्यासाठी निवडणूक महत्त्वाची मानत नाही. तर आमच्याकडे कार्यक्रम देखील आहे. आज ज्यांच्या हातात सत्ता आहे ते पैशांचा गैरवापर करत असल्याची टीका शरद पवारांनी केली.
चॅम्पियन्स ट्रॉफीआधी पाकिस्तानला मोठा झटका; भारताची पॉवर पुन्हा दिसली, ICCने पाहा यावेळी काय केले
पैसे टाकायचे आणि माणसे विकत घेण्याचा प्रयत्न करायचा आणि निवडणूका जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न दिसतोय. सत्ताधाऱ्यांनी काही कार्यक्रम घेतले. लाडकी बहिण योजना, त्यात महिलांना १५०० रुपये दिले, त्याबद्दल तक्रार नाही. पण पैसे देण्यापेक्षा त्यांचे संरक्षण करणे जास्त महत्त्वाचे आहे असे पवार म्हणाले.सांगली, इचलकरंजी येथील सभेनंतर शरद पवारांनी चंदगड येथे सभा घेतली. तर कागल येथे समरजित घाटगे यांच्यासाठी सभा घेत आहेत.