Navi Mumbai Crime News: राज्यात निवडणुकीचा हंगाम सुरू असून सुरक्षा यंत्रणा आणि प्रशासनाने कुठेही गैरव्यवहार होऊ नयेत यासाठी सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे. २० नोव्हेंबर रोजी राज्यात आदर्श आचारसंहिता लागू होताच पोलिसांकडून जागोजागी नाकाबंदी करण्यात आली आहे.
हायलाइट्स:
- एका रो-हाऊसमधून दोन कोटी साठ लाख रुपयांची रोकड जप्त
- निवडणूक आयोग आणि ठाणे पोलिसांची संयुक्त कारवाई
- नेरुळमधील धक्कादायक प्रकार
Jogeshwari Rada: वायकरांच्या लेकीचा पाठलाग, शिवसेना महिला कार्यकर्त्यांवर धावून गेले, ठाकरे समर्थकांवर विनयभंगाचा गुन्हा
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राज्यात ‘आदर्श आचारसंहिता’ लागू आहे. निवडणुकीच्या काळात मतं मिळविण्यासाठी मतदारांना रोख रक्कम दिली जात असल्याचा विरोधकांकडून आरोप होत असतो. या बाबींना आळा घालण्यासाठी आयकर विभाग, मुंबई पोलीस आणि निवडणूक आयोगाचे कर्मचारी हे गस्त घालत असतात. तसेच छापेमारी करत असतात. त्यातच आता नवी मुंबईमधील नेरुळ सेक्टर १६ येथील रो-हाऊसमधून पोलिसांनी अडीच कोटी रुपये जप्त केले आहेत.
वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नायकवडी यांनी सांगितले की, ”आम्ही एका रो- हाऊसमधून रोख जप्त केली आहे. साधारण अडीच कोटी रुपयांची ही रोकड आहे. ही जप्त केलेली रोकड कोणाची आहे आणि नवी मुंबईत कुठून आली? याचा तपास सध्या पोलिसांकडून सुरू आहे. निवडणूक आयोग आणि पोलिसांनी संयुक्तपणे ही रक्कम जप्त केली आहे”.