• Thu. Nov 14th, 2024
    वायकरांच्या लेकीचा पाठलाग, शिवसेना महिला कार्यकर्त्यांवर धावून गेले, ठाकरे समर्थकांवर विनयभंगाचा गुन्हा

    Mumbai Jogeshwari Thackeray and Shinde Camp Rada: ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांच्या अंगावर गेल्याप्रकरणी चार ते पाच जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. अशाप्रकारे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर तीन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

    हायलाइट्स:

    • जोगेश्वरीतील राजकीय राड्याला वेगळं वळण?
    • ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर गंभीर गुन्हा दाखल
    • जोगेश्वरीत नेमकं काय घडलं?
    महाराष्ट्र टाइम्स.कॉम
    रवींद्र वायकर मुलीचा पाठलाग गुन्हा दाखल

    मुंबई : राज्यात सर्वत्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरु असताना काल मंगळवारी रात्री मुंबईतील जोगेश्वरीमध्ये जोरदार राडा झाला. जोगेश्वरीत शिंदे गट आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते एकमेकांना भिडल्याचा प्रकार काल उघडकीस आला. त्यादरम्यान, या प्रकरणात एक मोठी बातमी समोर आली आहे. या राड्याप्रकरणी MIDC पोलिस ठाण्यामध्ये तीन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पहिला गुन्हा म्हणजे शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांच्या मुलीचा ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी पाठलाग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरा गुन्हा मातोश्री क्लबाहेर १५ ते २० मिनिटं जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड बंद केल्याप्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तिसरा गुन्हा म्हणजे ठाकरे गटाचे कार्यकर्ते शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांच्या अंगावर गेल्याप्रकरणी चार ते पाच जणांवर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. अशाप्रकारे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर तीन गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत.

    नेमकं काय घडलं?

    जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघात शिंदे गटाचे खासदार रवींद्र वायकर यांचे कार्यकर्ते महिलांना पैसे आणि काही वस्तू वाटप करत असल्याची बातमी मतदारसंघात वाऱ्यासारखी पसरली होती. यामुळे ठाकरे गटाचे कार्यकर्ते मातोश्री क्लब येथे जाब विचारायला गेले होते. त्याचवेळी शिंदे गटाचे आणि ठाकरे गटाचे शिवसैनिक एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने जोरदार राडा झाला. पण ऐनवेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा मोठा जमाव मातोश्री क्लबबाहेर जमला होता. यावेळी वायकरांच्या कार्यकर्त्यांनी गेटच्या आतून दगडफेक केल्याचा आरोप ठाकरे गटाने केला. त्यामुळे मातोश्री क्लबच्या बाहेर तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.
    Uddhav Thackeray : माझं रक्ताचं नातं… शिवरायांची शपथ घेऊन सांगतो, अमितला पाठिंबा नाही, उद्धव ठाकरेंची स्पष्ट भूमिका

    जोगेश्वरीत गोंधळ सुरु असताना याठिकाणी ठाकरे गटाचे जोगेश्वरी पूर्वचे उमेदवार बाळा नर सुद्धा उपस्थित होते. ते देखील शिवसैनिकांबरोबर राड्यात आघाडीवर दिसले. मातोश्री क्लब इथे गेल्यानंतर वायकरांच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण झाल्याचं ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. पोलिसांनी दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केली. या सगळ्या राड्यानंतर ठाकरे गटाचे नेते अनिल परब याठिकाणी आले होते. त्यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. मुंबईत सगळीकडे हेच सुरु आहे. अनेक ठिकाणी पैसेवाटप, धान्यवाटप सुरु आहे. गेले अनेक दिवस मातोश्री क्लबवर पैसे वाटले जात आहेत. आम्ही याबाबत निवडणूक आयोगाला कळवले आहे. मातोश्री क्लबवर गुंडआहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, यासाठी आम्ही इथे आलो आहोत, असे अनिल परब यांनी म्हटलं आहे.

    प्रशांत पाटील

    लेखकाबद्दलप्रशांत पाटीलप्रशांत पाटील यांना डिजिटल पत्रकारिता क्षेत्रात ३ वर्षांचा अनुभव आहे. ते ‘महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन’मध्ये कंटेंट प्रोड्यूसर म्हणून कार्यरत आहेत. याआधी थोडक्यात, आधान न्यूज वेबपोर्टलमध्ये डेस्कवर काम केलंय. महाराष्ट्रातील घडामोडी बघतात…. आणखी वाचा

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed