• Sun. Nov 24th, 2024
    नागपुरात मायावतींचा कॉंग्रेससह भाजपवर जोरदार हल्लाबोल, म्हणाल्या…

    नागपूर : बहुजन समाज पक्षाच्या (बसपा) सुप्रीमो मायावती आज नागपुरात पोहोचल्या. बेझनबाग मैदानावरील सभेला संबोधित करताना त्यांनी विदर्भाला राज्याचा दर्जा देण्याचेही समर्थन केले. बसपाने सर्व मतदारसंघात आपले उमेदवार उभे केले असून बहुजन व्होटबँक मजबूत होईल, अशी आशा आहे. यावेळी मायावतींनी विरोधकांवर भ्रष्टाचारासह अन्य आरोप केले. मायावतींनी केंद्र सरकारवर निशाणा साधत त्याला जातीयवादी म्हटले.
    ज्यांच्यात वादाचे खटके, त्यांच्यावरच लीड देण्याची जबाबदारी, कपिल पाटलांसाठी फडणवीस यांचा डाव!
    मायावती म्हणाल्या की, भाजप सरकारच्या काळात मागासवर्गीयांचे कोणत्याही प्रकारे उत्थान झाले नाही. मुस्लिमांसह इतर अल्पसंख्याक समुदायांसाठी देशात चांगले वातावरण नाही. सरकार धर्माच्या आधारे राजकारण करत असून त्याचा खूप वाईट परिणाम होत आहे. सध्याच्या भाजप सरकारच्या काळातही देशात बेरोजगारी आणि इतर समस्या शिखरावर आहेत. स्वतंत्रता नंतर देशातील बहुतांश ठिकाणी काँग्रेसची सत्ता होती. मात्र त्यांचा अधिकांश चुकीच्या नीतीमुळे आणि त्यांच्या चुकीच्या कार्यप्रणालीमुळे काँग्रेस पार्टीला सत्तेपासून दुर व्हावे लागले. तिच परिस्थिती त्यांच्या सहयोगी पक्षांनाही पक्षांची झाली. त्यामुळे मागील काही वर्षापासून भाजप आणि त्यांच्या सहयोगी पक्षांची केंद्र आणि अधिकांश राज्यात सत्ता आहे.काँग्रेसच्या चुकीच्या नीतीमुळे, धोरणांमुळे आम्ही बहुजन समाज पक्ष बनविले. जर काँग्रेस पक्ष मागासवर्गीयांचा विचार केला असता त्यांना संविधानानुसार लाभ दिला असता तर आम्हाला बहुजन समाज पक्ष तयार करायची गरज पडली नसती. काँग्रेस पक्ष सत्तेत असताना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना भारतरत्न मिळावा यासाठी अनेक संघर्ष करावे लागले. मात्र काँग्रेसने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जीवित असेपर्यंत त्यांना भारतरत्न सन्मानाने गौरविले नाही. जेव्हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मृत्यूनंतर त्यांची विचारधारा पुढे नेणारे कांची आमची काशीरामजी यांच्या मृत्यूनंतर एकही दिवस शोक केलेला नाही. वंचित आणि बहुजनांना आरक्षणाचा लाभ मिळवण्यासाठी तयार केलेले मंडळ आयोग काँग्रेसने लागू केले नाही. जेव्हा काँग्रेस पक्ष सत्तेतून बाहेर झाली तेव्हा व्ही.पी. सिंह यांची सहकार बनली तेव्हा मंडळ आयोग लागू करण्यात आले, असं त्या म्हणाल्या.

    ठाकरेंनी भाजपकडून जी जागा २०१९ ला मागून घेतली, तिथे नोटापेक्षाही कमी मतं मिळाली

    पुढे बोलताना मायावती म्हणाल्या की, मागील काही वर्षापासून भाजप आणि त्यांच्या सह्योग पक्ष केंद्र आणि राज्यात सत्ता आली. आता त्यांचा जातीवादी, पुंजीवादी,सांप्रदायिक द्वेषपूर्णनीती आणि कार्यप्रणालीमुळे असं वाटतंय भाजपही आपल्या चुकीच्या नितीमुळे सहजासहजी सत्ता येणार नाही. या निवडणुकीत भाजपची कुठलीही प्रणाली जुमलेबाजी, नाटकबाजी, कार्यांची यादी कामी येणार नाही. कारण जनतेला कळलं की, भाजपने दिन अच्छेचे स्वप्न दाखवले होते ते पूर्ण ढोंग होते. यांच्या संपूर्ण लक्ष त्यांचे मित्र असलेले मोठमोठे पुंजीपती यांना अधिक धनवान बनवण्यात त्यांची ताकत वाढवण्यात आपली ताकत लावत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed