• Sat. Sep 21st, 2024
प्रणिती शिंदेंच्या अडचणी वाढल्या, एमआयएम काँग्रेस विरोधात उमेदवार देण्याच्या तयारीत

सोलापूर: संभाजीनगर येथील एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांना निवडून देण्यासाठी सोलापुरात दबावाचं राजकारण करत आहे, असा गंभीर आरोप करत सोलापुरातील एमआयएम पदाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामे देत सोलापुरातील पक्षाच्या अध्यक्षकांवर देखील गंभीर आरोप केले आहे. संभाजीनगर येथे इम्तियाज जलील यांच्या विरोधात शिवसेना उद्धव गट आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार आहेत. भाजपचा उमेदवार नसल्याने भाजपचे फार मोठे नुकसान होणार नाही. इम्तियाज जलील यांच्या समोर थेट काँग्रेसचा उमेदवार नसल्याने सोलापुरात एमआयएम काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदेंसमोर दबावाचं राजकारण करत आहे, असा आरोप करत सोलापुरातील एमआयएमच्या राजकीय हालचालींना पक्षातील नाराज पदाधिकाऱ्यांनी विरोध केला आहे.
‘आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले’, मनसैनिकाची खदखद, अजून एका मनसे पदाधिकाऱ्याने राज ठाकरेंची साथ सोडली
रमेश कदम यांच्या उमेदवारीला विरोध
कोमारु सय्यद (जनरल सेक्रेटरी), रेश्मा मुल्ला (महिला आघाडीच्या अध्यक्ष), रियाज सय्यद (वाहतूक संघटनेचे अध्यक्ष), तौसिफ काझी (दक्षिण तालुका प्रमुख) यांनी राजीनामे दिले आहेत. एमआयएम पक्ष गेल्या अनेक वर्षांपासून फक्त एका विधानसभेपुरता मर्यादित राहिला आहे. रमेश कदम यांना लोकसभेची उमेदवारी देत आहे. यामागे काही तरी दबावाचं राजकारण सुरू आहे. सोलापुरात एमआयएमची मोठी ताकद नसतानाही लोकसभेचा उमेदवार देण्याची तयारी करत आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. आम्ही धर्मनिरपेक्ष आहोत. एमआयएम पक्ष भाजपच्या जातीय समीकरणाला अप्रत्यक्षपणे पाठिंबा देत आहे. मतांची विभागणी करण्याचा प्रयत्न करत आहे, असा आरोप एमआयएमच्या नेत्यांनी केला आहे. संभाजीनगर येथील एमआयएमचे उमेदवार इम्तियाज जलील यांना विजयी करण्यासाठी सोलापुरात मुस्लिम समाजाला का वेठीस धरत आहात? असा सवालही उपस्थित केला आहे.

अरे मुर्खांनो व्हायचं असतं तर तेव्हाच शिवसेनाप्रमुख झालो असतो : राज ठाकरे

रमेश कदमांच्या एन्ट्रीने एमआयएममध्ये अंतर्गत नाराजी
मोहोळ विधानसभा मतदारसंघातील माजी आमदार रमेश कदम यांनी काही दिवसांपूर्वी एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांची भेट घेतली होती. आगामी लोकसभा निवडणुकीत एमआयएमकडून दलित उमेदवार म्हणून रमेश कदम असतील. आमचं पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा सुरू आहे, अशी प्रतिक्रिया फारूक शाब्दी यांनी दिली होती. मात्र रमेश कदम यांच्या एन्ट्रीमुळे सोलापुरात एमआयएमच्या पदाधिकाऱ्यांत नाराजी पसरली. अखेर सोलापूर एमआयएमचे जनरल सेक्रेटरी कोमारू सय्यद, रेशमा मुल्ला, रियाज सय्यद, तौसिफ काजी यांनी सोलापूर लोकसभा मतदारसंघात एमआयएमने उमेदवार देऊ नये, अशी भूमिका मांडत राजीनामा दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed