• Sun. Nov 24th, 2024
    शेतकरी संघटनेकडून कांदा लिलाव केंद्र सुरू, पहिल्या सत्रात १५० वाहन बाजारात, जाणून घ्या दर

    शुभम बोडके, नाशिकः नाशिक जिल्हा हा कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. नाशिकच्या चांदवड, मनमाड-नांदगाव, निफाड, बागलाण या तालुक्यांमध्ये सर्वाधिक कांदा पिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र सध्या कांदा उत्पादक शेतकरी हा मोठ्या प्रमाणात अडचणी सापडला आहे. मागील दहा दिवसांपासून कांदा खरेदी बंद असल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. मात्र आज कांदा खरेदी करण्यासाठी शेतकरी संघटना पुढाकार घेत कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा दिला आहे.
    सांगलीत विशाल पाटील बॉम्ब टाकण्याचे संकेत, लवकरच निर्णय घेतील, प्रकाश आंबेडकरांचे वक्तव्यहमाल आणि व्यापारी यांच्या वादामुळे नाशिकमध्ये कांदा खरेदी ही बंद होती. शेतकरी संघटनेने अखेर आज पासून कांदा खरेदी सुरू केली आहे. बागलाण तालुक्यात शेतकरी संघटना आज पासून कांदा लिलाव सुरू केले. जवळपास पहिल्या सत्रात १५० वाहन बाजारात दाखल झाले. ४५०० क्विंटल कांद्याची आवक ही पाहायला मिळाली. सरासरी १००० ते १४०० रुपये इतका कांद्याचा दर शेतकऱ्यांना मिळाला. दिवसभरात कांद्याची शेकडो वाहने दाखल झाली. लासलगाव बाजार समिती बाहेर शेतकरी संघटनेच्या माध्यमातून कांदा विक्री ही काल सुरू करण्यात आली होती. आज देखील २०० वाहने हे कांदा विक्री केंद्रावर दाखल झाल्याचा पाहायला मिळालं.आज कांद्याला सरासरी १००० ते १५०० पर्यंत भाव शेतकऱ्यांना मिळाला. शेतकऱ्यांची आवक देखील दिवसभरात वाढल्याचं शेतकरी संघटनेने सांगितलं. कांदा खरेदी सुरू झाल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. नाशिक जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी यंदा सर्वाधिक संकटात सापडल्याचं पाहायला मिळालं. केंद्र सरकारने निर्यात बंदी केल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. कांद्याचे भाव घसरल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर मात्र उपासमारीची वेळ आल्याचा पाहायला मिळत आहे. निवडणुकीच्या काळात देखील शेतकऱ्यांना गृहीत धरून केंद्र सरकारने ३१ मार्चनंतर देखील कांदा निर्यात बंदी ही कायम ठेवली आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारच्या धोरणामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी दिसून येत आहे.

    मी खासदार होणार याची शर्मिला वहिनींना शाश्वती, निवडून आल्यानंतर आशीर्वाद घ्यायला जाणार | वसंत मोरे

    कांदा पिक परवडत नसल्यामुळे सध्या शेतकरी चिंतेत आहे. खते आणि औषधांची किंमत वाढल्यामुळे कांदा पीक शेतकऱ्यांना परवडत नाही. मात्र कांदा पीक हे नाशवंत असल्याने शेतकरी कांदा साठवून देखील ठेवू शकत नाही. मिळेल त्या भावात कांदा उत्पादक शेतकरी आता बाजारात कांदा विक्रीसाठी घेऊन जात आहे. मागील दहा दिवसांपासून हमाल आणि व्यापारी यांच्या वादामुळे कांदा लिलाव बंद होते. याचा थेट फटका शेतकऱ्यांना बसत असल्याचा पाहायला मिळत होतं. मात्र आज पासून शेतकरी संघटना कांदा खरेदी करण्यास सुरुवात केली आणि कांद्याला अवघा १००० ते १५०० इतकाच भाव मिळत आहे. त्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत असला तरी देखील कांदा साठवून न ठेवता मिळेल त्या भावात कांदा विक्री करण्यासाठी कांदा खरेदी केंद्रांवर शेतकरी गर्दी करत आहे. कांदा खरेदी सुरू झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आता काहीसे दिलासादायक वातावरण पाहायला मिळत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed