• Sat. Sep 21st, 2024

काँग्रेसच्या वाट्याला काहीच नाही, नाना पटोलेही त्याच वाटेने निघाले… भाजप पदाधिकाऱ्याला चिंता

काँग्रेसच्या वाट्याला काहीच नाही, नाना पटोलेही त्याच वाटेने निघाले… भाजप पदाधिकाऱ्याला चिंता

अहमदनगर : ‘काँग्रेसचा सन्मान आणि स्वाभिमान जपत इतर समविचारी पक्षासोबत पूर्वी आघाडी केली जात होती. अलीकडे मात्र महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व करणारी मंडळी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यासमोर शरणागत झाल्यासारखी अवस्था निर्माण झाली आहे. त्यातील काही नेते तर पूर्वीपासूनच शरद पवार यांच्या सल्ल्यानेच काम करतात, असा अनेक वेळा उघड आरोप देखील झालेला आहे. पुढे नाना पटोले यांनी महाराष्ट्र काँग्रेसची सूत्र हाती घेतल्यानंतर काँग्रेसला एक ऊर्जावान नेतृत्व मिळाल्याचा माझ्यासह सर्वांना आनंद झाला होता. मात्र मागील दोन वर्षात स्थानिक पातळीवरील काँग्रेस अंतर्गत वस्तुस्थितीचा राजकारणाचा आढावा घेता पटोलेही त्याच वाटेने जात असल्याचे जाणवते,’ असे अलीकडेच काँग्रेस सोडून भाजपध्ये प्रवेश केलेले विनायक देशमुख यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकील महाविकास आघाडीच्या जागा वाटपात काँग्रेसच्या वाट्याला फार काही आले नसल्याचे सांगत देशमुख यांनी पक्षाच्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले आहे.

देशमुख यांनी म्हटले आहे, १९९० पासून मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून काम करत होतो. युवक काँग्रेस, जिल्हा काँग्रेस, प्रदेश काँग्रेस ए.आय.सी.सी. अशा विविध स्तरावर मी संघटनेत कार्यरत होतो. या काळात स्व. शिवाजीराव देशमुख, सुशील कुमार शिंदे, प्रतापराव भोसले स्व. गोविंदराव आदिक स्व.प्रभाताई राव, माणिकराव ठाकरे, अशोकराव चव्हाण, बाळासाहेब थोरात आणि नाना पटोले या प्रदेशाध्यक्षांच्या समवेत आणि मार्गदर्शनाखाली मला काम करण्याची संधी मिळाली. अनेक वेळा काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी करावी लागली. मात्र अशा प्रकारची आघाडी करताना त्या त्या वेळच्या प्रदेशाध्यक्षांनी काँग्रेस पक्षाच्या आणि काँग्रेस कार्यकर्त्यांच्या सन्मानाला धक्का लागणार नाही, याची काळजी घेतलेली होती.
आजचा अग्रलेख : विरोधकांच्या ऐक्याची गुढी

काँग्रेस शरद पवार यांच्या सल्ल्यानेच काम करते

“सध्या महाविकास आघाडी या नावाखाली तीन पक्षांची आघाडी आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या दोघांकडेही ज्येष्ठ नेते शरद पवार व उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासारखे कणखर व आपल्या पक्षाची बाजू आग्रहाने मांडणारे नेतृत्व आहे. त्या तुलनेत महाराष्ट्र काँग्रेसचे नेतृत्व करणारी मंडळी पवार आणि ठाकरे यांच्यासमोर शरणागत झाल्यासारखी अवस्था निर्माण झाली आहे. त्यातील काही नेते तर पूर्वीपासूनच शरद पवार यांच्या सल्ल्यानेच काम करतात, असा अनेक वेळा उघड आरोप देखील झालेला आहे”.
जिंकण्याचं एक मोठं उद्दिष्ट समोर ठेवल्यानंतर लढावंच लागतं – उद्धव ठाकरे

नाना पटोलेंनी सूत्र हाती घेतल्यानंतर मला आनंद झाला होता पण…..

“नाना पटोले यांनी महाराष्ट्र काँग्रेसची सूत्र हाती घेतल्यानंतर काँग्रेसला एक ऊर्जावान नेतृत्व मिळाल्याचा माझ्यासह सर्वांना आनंद झाला होता. मात्र मागील दोन वर्षात स्थानिक पातळीवरील काँग्रेस अंतर्गत वस्तुस्थितीचा राजकारणाचा आढावा घेण्यात आणि त्यावर उपाययोजना करण्यात आलेले अपयश, राज्यस्तरावरील नेत्यांमधील समन्वयाचा अभाव, प्रदेशाक्षांभोवती निर्माण झालेली चौकडी, जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकारी यांना विश्वासात न घेता परस्पर घेतले जाणारे निर्णय, यामुळे तालुका स्तरापासुन राज्यस्तरावर निर्माण झालेला असंतोष यामुळे प्रदेश काँग्रेस टीम म्हणून काम करण्यात फारशी यशस्वी झाली नाही. त्यामुळेच अगदी गावपातळीपासून राज्यस्तरीय मोठ्या नेत्यांनी पक्षापासून दूर होण्याचा निर्णय घेतला. मीही काँग्रेस मधील माझ्या ३५ वर्षांच्या प्रवासाला त्यामुळेच विराम दिला”, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.

आम्हाला इशारा देण्याची आवश्यकता नाही, सांगलीच्या जागेसाठी विश्वजित कदम आग्रही

गावोगावच्या काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये निराशा

जागा वाटपासंबंधी त्यांनी म्हटले, ज्या पद्धतीने महाविकास आघाडीचे जागावाटप झाले, त्याबद्दल गावोगावच्या कार्यकर्त्यांच्या मनात निराशेची भावना आहे. पाच वर्षे पक्षाच्या आदेशानुसार काम करायचे आणि ऐन निवडणुकीच्या परीक्षेला बसण्याची त्यांची संधी हिरावून घ्यायची, हे अत्यंत दुर्देवी आहे. सांगली, भिवंडीची जागा, मुंबईमधील जागा याबाबत झालेले जागावाटप यामुळे कार्यकर्ते प्रचंड नाराज आहेत. याशिवाय असे अनेक जिल्हे आहेत की त्याठिकाणी जागावाटपात किमान एकतरी जागा मिळविण्यात नेतृत्व अपयशी ठरले आहे, असेही देशमुख यांनी म्हटले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed