अशी होणार लढत
धुळे- डॉ सुभाष भामरे विरुद्ध डॉ. शोभा बच्छाव
जालना- रावसाहेब दानवे विरुद्ध डॉ. कल्याण काळे
जालन्याच्या इतिहास काय?
जालना मतदारसंघात १९९६ पासून झालेल्या झालेल्या सात लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा सलग पराभव झाला असून भाजपचा उमेदवार तेथे निवडून आला आहे. यापैकी दोन निवडणुकांत भाजपच्या तिकिटावर उत्तमसिंग पवार निवडून आले होते, तर त्यानंतरच्या सलग पाच निवडणुकांत भाजपकडून रावसाहेब दानवे यांनी जालन्याचे प्रतिनिधित्व केले. भाजपने यंदाही रावसाहेब दानवे यांना उमेदावारी दिली आहे. २००९ मध्ये कल्याणराव काळे यांनी काँग्रेसकडून निवडणूक लढविताना रावसाहेब दानवे यांना तगडे आव्हान दिले होते. यावेळच्या लढतीत काय होते, हे पाहणे औत्सुक्याचे असेल.
कल्याणराव काळे कोण आहेत?
कल्याणराव काळे यांची काँग्रेसचे निष्ठावंत अशी ओळख आहे
कल्याणराव काळे हे माजी आमदार आहेत
२०० साली त्यांनी रावसाहेब दानवे यांच्याविरोधात लोकसभा लढली होती
त्यांनी दानवेंना तगडी टक्कर दिली होती, परंतु त्यांचा पराभव झाला होता
धुळे लोकसभेतून डॉ. शोभा बच्छाव निवडणुकीच्या रिंगणात
धुळे लोकसभा हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला होता. परंतु, नरेंद्र मोदी यांचा राजकीय क्षितीजावर उदय झाल्यापासून मागील तीन निवडणुकीत मतदारांनी भाजपवर विश्वास दाखवला. काँग्रेसतर्फे धुळे ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार कुणाल पाटील यांचे नाव चर्चेत होते, परंतु त्यांनी निवडणूक लढविण्यास नकार दिल्याने डॉ. शोभा बच्छाव यांना काँग्रेसने निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.
धुळे लोकसभा मतदारसंघात नाशिक जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघाचा समावेश होतो. त्यामुळे नाशिक जिल्ह्यातील मतदारसंघांचा विचार केल्यास तीन मतदारसंघांची साथ काँग्रेस उमेदवाराला मिळू शकेल, अशी राजकीय समीकरणे असल्याने नाशिक जिल्ह्यातील माजी राज्यमंत्री डॉ. शोभा बच्छाव यांना काँग्रेसकडून उमेदवारी दिली गेली आहे.
कोण आहेत शोभा बच्छाव?
शोभा बच्छाव या काँग्रेसच्या नेत्या आहेत
शोभा बच्छाव यांनी राज्यमंत्री म्हणूनही काम पाहिलंय.
तसेच त्या नाशिकच्या माजी महापौर देखील होत्या