कोणत्या जागा कोण लढवणार?
काँग्रेस – (१७)
नंदुरबार, धुळे, अकोला, अमरावती, नागपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली चिमुर, चंद्रपूर, नांदेड, जालना, मुंबई उत्तर मध्य, पुणे, लातूर, सोलापूर, कोल्हापूर, रामटेक, उत्तर मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेस (१०)
बारामती, शिरुर, सातारा, भिवंडी, दिंडोरी, माढा, रावेर, वर्धा, अहमदनगर दक्षिण आणि बीड
शिवसेना (२१)
जळगाव, परभणी, नाशिक, पालघर, कल्याण डोंबिवली, ठाणे, रायगड, मावळ, धाराशिव, रत्नागिरी सिंधुदुर्ग, बुलढाणा, हातकणंगले, संभाजीनगर, शिर्डी, सांगली, हिंगोली, यवतमाळ वाशिम, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई, ईशान्य मुंबई
मुंबईतील शिवालय येथे महाविकास आघाडीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. यावेळी उद्धव ठाकरे यांची शिवसेना, शरद पवार यांची राष्ट्रवादी, काँग्रेस आणि इतर घटकपक्षांचे प्रमुख नेते सहभागी झाले होते. शरद पवार, उद्धव ठाकरे, पृथ्वीराज चव्हाण, नाना पटोले, जयंत पाटील, संजय राऊत यावेळी उपस्थित होते. या पत्रकार परिषदेआधी काँग्रेस नेते नाना पटोले, बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांची स्वतंत्र बैठक झाली होती. महाविकास आघाडीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीसह माकप, भाकप, आप, समाजवादी पक्ष सहभागी असल्याचं सांगण्यात आलं.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News