जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूरच्या महालक्ष्मीनगर परिसरात पान टपरीवर सिगारेट ओढत असलेल्या मुलीचा व्हिडिओ बनवण्याच्या वादातून एक तरुणाची हत्या झाल्याची घटना घडली आहे. या हत्या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली असून, त्यांच्या एका साथीदाराचा शोध सुरू आहे. या हत्या प्रकरणाच्या तपासादरम्यान धक्कादायक माहिती समोर आली आहे. या घटनेच्या वेळी दोन्ही मुली एमडीच्या प्रभावाखाली होत्या. त्यांनी स्वत: त्यांच्या गुन्हेगार मित्रांना घटनास्थळी बोलावले त्यानंतर ही दुर्घटना घडली.हत्येची ही घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या महालक्ष्मी नगरकडे सभागृहाजवळ शनिवारी रात्री घडली. सिगारेट ओढत असताना क्षुल्लक कारणावरून झालेल्या वादानंतर मुलींनी मित्राच्या मदतीने तरुणाची हत्या केली. या हत्येत दोन मुलींसह त्यांच्या इतर दोन साथीदारांनी रणजित राठोड नावाच्या तरुणाची निर्घृण हत्या केली. हत्येची ही घटना परिसरात लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाली असून, त्याआधारे पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली.
अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये आकाश राऊत, जयश्री पांढरे आणि सविता सायरे यांचा समावेश आहे. पान टपरीवर सिगारेट ओढत असताना तरुणीची मृतक रणजीतशी बाचाबाची झाली. त्यानंतर जयश्रीने सिगारेटचा धूर रणजीतच्या तोंडावर सोडला. यामुळे रणजित संतापला आणि शिवीगाळ केली. त्यानंतर रणजितने तिचा व्हिडिओ बनवण्यास सुरुवात केली. यादरम्यान तरुणीने तिचा मित्र मायकलला फोन केला, मात्र मायकलचा मोबाईल बंद असल्याने तिने मायकलचा भाऊ आकाश राऊत याला फोन करून घटनास्थळी बोलावले.

आकाश त्याचा मित्र जीतूसह घटनास्थळी पोहोचला आणि आरोपींनी दोन मुलींसह रणजीतवर चाकूने हल्ला करून निर्घृण हत्या केली. या प्रकरणातील मुख्य आरोपी जयश्रीला एमडी ड्रग्जचे व्यसन असून ती मूळची अकोल्याची असल्याचं तपासात समोर आले आहे. ती गेल्या २ वर्षांपासून नागपूरच्या शेषनगर येथे भाड्याने राहत होती. या प्रकरणी पकडल्या गेलेला आकाशची गुन्हेगारी प्रवृत्ती असून, त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नासारखे सुमारे ५ गुन्हे दाखल आहेत.