शुभम बोडके, नाशिक : नाशिक शहरात दिवसेंदिवस गंभीर गुन्हे घडत असल्याच्या प्रकारात वाढ होताना दिसते आहे. खून, दरोडे, जीव घेणे हल्ले यांसह आता गोळीबाराच्या देखील घटना नाशिक शहरात घडू लागल्या आहेत. रविवारी ७ एप्रिल रोजी रात्री उशिरा नाशिक शहरातील सिडको परिसरात टोळी युद्ध घडलं. दोन गटात गोळीबार झाल्याने नाशिक शहरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या सिडको त्रिमूर्ती नगरमध्ये भर वस्तीत रविवारी मध्यरात्री टोळीमधून गोळीबार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन सराईत गुन्हेगारांमध्ये झालेल्या वादातून एकाने दुसऱ्यावर गोळीबार केल्याची घटना सिडकोतील त्रिमूर्ती चौक परिसरात रात्री घडली. गुंडांनी तलवार घेऊन परिसरात दहशत माजवली. या घटनेने संपूर्ण परिसर हादरला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. दरम्यान दोन्ही टोळ्यांमधील गुन्हेगार गोळीबाराच्या घटनेनंतर फरार झाले होते. याबाबत अंबड पोलिसांकडून त्यांचा कसून शोध सुरू असून ६ संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
सिडको परिसरात राहणारा वैभव शिर्के आणि दर्शन दोंदे या दोन गुन्हेागारांमध्ये रात्री वाद झाले. दोघांनी एकमेकांना बघून घेण्याची धमकी दिली. काही मित्रांच्या मध्यस्थीने वाद मिटला होता, पण रात्रीच्या सुमारास सराईत गुन्हेगार दर्शन दोंदे याने वैभव शिर्केला बोलावून घेतलं आणि दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. दर्शन दोंदेने गावठी पिस्तूल काढत वैभववर रोखली असता जीव वाचवण्यासाठी वैभवने पळण्याचा प्रयत्न केला. पण दर्शनने पाठीमागून गोळीबार केला. नेम चुकल्याने वैभव थोडक्यात वाचला. याबाबत अंबड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलं.
सदर घटनेच्या हाणामारीचं सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. गोळीबाराच्या घटनेच्या अवघ्या काही तासातच ६ संशयित आरोपी अंबड पोलिसांच्या ताब्यात आले आहेत. वर्चस्वाच्या वादातून सदर घटना घडल्याची प्राथमिक माहिती असून नाशिकचे अंबड पोलीस अधिक तपास करत आहेत.
नाशिक शहरात अंबड सातपूर या परिसरामध्ये अनेक दिवसांपासून गंभीर गुन्ह्यांची नोंद होत आहे. शाळकरी विद्यार्थ्यांच्या बॅगेत धारदार शस्त्र सापडण्याच्या देखील घटना मागील काळात घडल्या. सातपूर शहरात एका १९ वर्षाच्या तरुणाचा देखील आठ दिवसांपूर्वी गळा चिरून खून करण्यात आला होता. त्यानंतर आता अवघ्या आठ दिवसानंतर सिडको परिसरात गोळीबारातून टोळी युद्ध रंगलं.

नाशिक पोलिसांचा या गुन्हेगारांवर वचक राहिलाय काय असा प्रश्न आता सर्वसामान्य नाशिककर विचारू लागले आहेत. या घटनेमुळे नाशिक पोलिसांवर टीकेची झोड उठवली जात आहे. मात्र नाशिक पोलीस आता या गुन्हेगारांच्या मुस्क्या आवळण्यात यशस्वी होतात का हे बघणं महत्त्वाचं आहे.