• Sun. Nov 24th, 2024
    लोकसभा निवडणुकीसाठी बुलढाण्यात २७० ‘लालपरीं’चे बुकिंग; जाणून घ्या, इतर आगारातील बसेसचे नियोजन

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी निवडणूक विभागाने राज्य परिवहन महामंडळाच्या बुलढाणा विभागाकडून २७० बसेसचे बुकिंग केले आहे. सोबतच विविध पथकांमधील अधिकारी, कर्मचाऱ्यांना निवडणूक काम जलदगतीने करण्याच्या दृष्टीने लागणारी वाहने पुरविण्याची प्रक्रिया उपप्रादेशिक परिवहन कार्यालय करीत आहे. यात ५४ मिनी बस आणि ५२४ जीप गाड्या बुक केल्या जाणार असल्याची माहिती आहे.लोकसभा निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन जोमाने कामाला लागले आहे. बसेस पुरविण्याचे जिल्हा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचे पत्र प्राप्त होताच लोकसभा निवडणुकीसाठी एसटी महामंडळाने बसगाड्यांची व्यवस्था केली आहे. बुलढाणा आगारातून ४२ बसेस दिल्या जाणार आहेत. यासोबतच चिखलीतून ३९, सिंदखेड राजा ४३, मेहकर ४३, खामगाव ३१, जळगाव जामोद ४० आणि मलकापूर आगारातून ३२ अशा बसेसचे नियोजन बुलढाणा आगाराचे विभाग नियंत्रक अशोक वाडीभस्मे यांनी केले आहे. २६ एप्रिलला मतदान असल्याने २५ एप्रिल रोजी ईव्हीएम व कर्मचाऱ्यांना संबंधित मतदान केंद्रांवर या बसेसद्वारे पोहचविले जाणार आहे. तर मतदान झाल्यानंतर ईव्हीएम आणि पथकांना याच बसेसमधून परत आणले जाणार आहे. १३ मे रोजी रावेर लोकसभा मतदारसंघासाठी मतदान होणार आहे. त्यासाठी १२ मे रोजी मतदान यंत्रांसह कर्मचाऱ्यांना बसेसद्वारे सोडले जाणार आहे.

    धुळीमुळे गुदमरतोय सातारा-देवळाईवासीयांचा श्वास, रखडलेल्या कामाचाही त्रास, प्रशासनाची डोळेझाक

    पोलिस बंदोबस्तासाठी स्वतंत्र वाहने

    बुलढाणा जिल्ह्यात मतदान सुरक्षित व्हावे म्हणून चोख पोलिस बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. पोलिसांचा फौजफाटा नेण्यासाठी २७० बसेसशिवाय आणखी बसेसची मागणी पोलिस दलातर्फे विभाग नियंत्रकांकडे केली जाणार आहे. यासोबतच पोलिस विभागाची वाहनेही उपयोगात आणली जाणार आहेत.

    घरपोच मतदानासाठीही वाहने

    आचारसंहिता पथके, क्षेत्रीय अधिकाऱ्यांची पथके, सुक्ष्म निरीक्षकांची पथके आणि अन्य पथकांच्या सेवेत जीप, कार वापरल्या जाणार आहेत. त्याचप्रमाणे ८५ वर्षे वयोवरील ज्येष्ठ मतदारांना घरबसल्या मतदान करण्याची सुविधा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी वाहने दिली जाणार आहेत.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed