• Mon. Nov 25th, 2024

    आनंदाची बातमी! पुण्याहून ‘या’ शहरासाठी धावणार समर स्पेशल ट्रेन्स, जाणून घ्या वेळापत्रक

    आनंदाची बातमी! पुण्याहून ‘या’ शहरासाठी धावणार समर स्पेशल ट्रेन्स, जाणून घ्या वेळापत्रक

    म. टा. प्रतिनिधी, पुणे : प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने पुणे ते दानापूर, पुणे ते नागपूर आणि पुणे ते हजरत निजामुद्दीनसाठी उन्हाळी विशेष गाड्यांच्या ७० फेऱ्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सुट्टीच्या काळात प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे.

    पुणे-नागपूर-पुणे ३८ फेऱ्या

    ‘पुणे-नागपूर सुपरफास्ट द्विसाप्ताहिक विशेष गाडी’ १४ एप्रिल ते १६ जूनदरम्यान दर मंगळवार व रविवारी पुण्यातून दुपारी तीन वाजून ५० मिनिटांनी सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सकाळी ६.३० वाजता नागपूरला दाखल होईल. नागपूर-पुणे सुपरफास्ट द्विसाप्ताहिक विशेष गाडी १३ एप्रिल ते १५ जूनदरम्यान दर सोमवार, शनिवार नागपूरहून रात्री सात वाजून ४० मिनिटांनी सुटेल. ती पुण्यात दुसऱ्या दिवशी सकाळी ११ वाजून २५ मिनिटांनी दाखल होईल.

    पुणे-दानापूर-पुणे आठ फेऱ्या

    पुणे- दानापूर सुपरफास्ट द्विसाप्ताहिक विशेष ही ११, १४ एप्रिल, दोन व पाच मे रोजी (गुरुवार व रविवार) पुण्याहून सकाळी ६.३० वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी दुपारी १२ वाजता दानापूरला पोहोचेल. दानापूर-पुणे सुपरफास्ट द्विसाप्ताहिक विशेष एक्स्प्रेस १२, १५ एप्रिल, तीन आणि सहा मे (शुक्रवार, सोमवार) रोजी दानापूर येथून दुपारी एक वाजून ३० वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी रात्री पावणेआठ वाजता पुण्यात दाखल होईल.
    रेल्वेप्रवाशांनो कृपया लक्ष द्या! आता नंदीग्राम एक्सप्रेस धावणार दादरपर्यंतच, ‘या’ ट्रेन्सचेही रुट बदलले
    पुणे–हजरत निजामुद्दीन-पुणेच्या २४ फेऱ्या

    पुणे-हजरत निजामुद्दीन साप्ताहिक सुपरफास्ट विशेष १२ एप्रिल ते २८ जूनदरम्यान दर शुक्रवारी पुण्याहून सायंकाळी ५.३० वाजता सुटेल. ती दुसऱ्या दिवशी सायंकाळी ४.४५ वाजता हजरत निजामुद्दीनला पोहोचेल. हजरत निजामुद्दीन- पुणे साप्ताहिक सुपरफास्ट विशेष गाडी दर शनिवारी हजरत निजामुद्दीन येथून रात्री १० वाजून १० मिनिटांनी सुटून दुसऱ्या दिवशी रात्री ११ वाजून ५५ मिनिटांनी पुण्यात दाखल होईल.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *