• Sat. Sep 21st, 2024

चेक पोस्टवर दारु पिऊन झोपणे भोवले, दोन निवडणूक कर्मचारी निलंबित; भंडारा जिल्ह्यातील प्रकार

चेक पोस्टवर दारु पिऊन झोपणे भोवले, दोन निवडणूक कर्मचारी निलंबित; भंडारा जिल्ह्यातील प्रकार

म. टा. वृत्तसेवा, भंडारा : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमेवरील नीलज येथे तपासणी नाका उभारण्यात आला. या नाक्यावरील कर्मचारी दारू प्राशन करून झोपलेले असल्याची निवडणूक निरीक्षकांच्या पाहणीत समोर आले. याप्रकरणी दोन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे.

काय प्रकरण?

पवनी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एल. जे. कुंभारे आणि भंडारा पाटबंधारे विभागाचे वरिष्ठ लिपिक सचिन पढाळ अशी निलंबित कर्मचाऱ्यांची नावे आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्याच्या सीमा सील करण्यात आल्या आहेत. वाहनांची तपासणी केली जात आहे. संशयितांवर नजर ठेवली जात आहे. नीलज तपासणी नाक्यावर स्थिर सर्वेक्षण पथकामध्ये कुंभारे आणि पढाळ यांची नियुक्ती करण्यात आली होती. ५ एप्रिल रोजी निवडणूक निरीक्षक (खर्च) आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांनी नीलज चेकपोस्टला भेट दिली. पवनीचे तहसीलदार, पवनीचे पोलिस निरीक्षक उपस्थित होते. परंतु, सदर कर्मचारी दिसून न आल्यामुळे तिथे उभारण्यात आलेल्या पेंडॉलमध्ये प्रवेश केला असता दोन्ही कर्मचारी झोपलेले दिसून आले. त्यांना उठवून निवडणूक निरीक्षकांसमोर हजर केले असता त्यांना बोलणेही शक्य होत नव्हते. त्यांनी मद्यप्राशन केले असल्याचे लक्षात येताच दारू पिऊन झोपल्याचे लक्षात येताच पोलिस त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी घेऊन गेले.

२०० गाड्यांच्या ताफ्यासह ज्योती मेटे बीड जिल्ह्यात दाखल

वैद्यकीय प्रमाणपत्रानुसार त्यांनी दारू प्राशन केल्याचे सिद्ध झाले. त्यामुळे दोघांनाही निलंबित करण्यात आले आहे. या प्रकारामुळे चेकपोस्टवर नियुक्त असलेल्या कर्मचाऱ्यांमध्ये धडकी भरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed