• Sat. Sep 21st, 2024

प्रणिती शिंदेंना स्वकीयांकडून पाठिंब्याची गरज, मात्र नाराज माजी पदाधिकाऱ्यांचा धोका, वाचा नेमकं समीकरण

प्रणिती शिंदेंना स्वकीयांकडून पाठिंब्याची गरज, मात्र नाराज माजी पदाधिकाऱ्यांचा धोका, वाचा नेमकं समीकरण

सोलापूर: सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रणिती शिंदेंना तोडीस तोड म्हणून भाजपने युवा आमदार राम सातपुतेंना उमेदवारी दिली आहे. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत प्रणिती शिंदेना स्वकीयांकडून भक्कम पाठिंबा गरजेचा आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीत काँग्रेसमधीलच दिग्गज नेत्यांचा भरणा झाला आहे. काही दिवसांपूर्वी तुतारी हातात घेतलेल्या माजी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका स्पष्ट केली. मात्र म्हणावी तशी साथ निवडणुकीच्या रणांगणात दिसत नाही.तुतारी हातात घेतलेली मोठी नाराज फळी सद्यस्थितीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मोठ्या पदावर आहे. सुधीर खरटमल, यु एन बेरिया, महेश कोठे, तौफिक शेख, नलिनी चंदेले यांनी प्रणिती शिंदे यांना नाराज होऊन काँग्रेस पक्ष सोडला, असे अप्रत्यक्षपणे अनेकदा सांगितले जाते. ही नाराज फळी महाविकास आघाडीत आज वेगवेगळ्या ठिकाणी भाषण करताना प्रणिती शिंदेंना निवडून देऊ किंवा महाविकास आघाडीला निवडून देऊ, असे जाहीरपणे सांगत असले तरी या नाराज फळीचा भक्कम पाठिंबा प्रणितींना गरजेचं आहे.
अकोला लोकसभेसाठी प्रहार पक्षाचा पाठिंबा कुणाला? बच्चू कडू बैठकीत घेणार निर्णय
२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसने सुशीलकुमार शिंदे ऐवजी प्रणिती शिंदेंना उमेदवारी दिली आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत सोलापुरात एक मोठी राजकीय फळी निर्माण केली होती. सुधीर खरटमल, यु एन बेरिया, महेश कोठे यांच्याकडे तर सोलापूर काँग्रेसच्या सर्व चाव्या होत्या. मात्र हळूहळू काँग्रेसमधील दिग्गज नेते मंडळी काँग्रेसपासून लांब होत गेली. सुधीर खरटमल तर सोलापूर काँग्रेसचे शहर अध्यक्ष होते. यु एन बेरिया सोलापूर महानगरपालिकेत काँग्रेसची सर्व सूत्रे सांभाळत होते.

नलिनी चंदेले काँग्रेसकडून महापौर होत्या. तौफिक शेख यांनी विधानसभेची उमेदवारी घेत २०१४ साली एमआयएमची पतंग हातात घेतली. सद्यस्थितीत ही नेते मंडळी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आहेत. दिग्गज नेत्यांची आणि अनुभवी राजकीय फळी काँग्रेसपासून दूर का गेली याचं खुलासा आजतागायत शिंदे परिवाराने केला नसला तरी दबक्या आवाजात केलेली चर्चा सर्वश्रुत आहे. सुधीर खरटमल सध्या राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर अध्यक्ष आहेत. यु एन बेरिया प्रदेश उपाध्यक्ष आहेत. माजी महापौर महेश कोठे, नलिनी चंदेले, तौफिक शेख ही सर्व नेते मंडळी राष्ट्रवादीत (शरद पवार गट) मोठ्या पदावर आहेत.

मला कुठंतरी लांब पाठवायचा तुमचा विचार, उदयनराजेंकडून पत्रकारांवर शंका उपस्थित

तुतारी हातात घेतलेल्या पदाधिकाऱ्यांनी काही दिवसांपूर्वी लोटस हॉटेलमध्ये पत्रकार परिषद घेत प्रणिती शिंदेना महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देत आहोत, असे जाहीरपणे सांगितले. मात्र तुतारी हातात घेतलेली ही राजकीय फळी नाराज असल्यासारखी परिस्थिती आहे. म्हणावा तसा पाठिंबा अजूनही मिळत नाही. प्रणिती शिंदे या मतदारसंघात काँग्रेसमधील पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना सोबत घेत प्रचार करत आहेत. नाराज फळीला माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे आपल्याकडे वळवून घेतील, असा अंदाज देखील वर्तवला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed