दरम्यान, मागील महिन्यातच मुसळगाव येथील एका ऑरगॅनिक कारखान्याला आग लागून कंपनीचे करोडोंची नुकसान झाले होते. मात्र पुन्हा मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील एका प्लास्टिक बनवणाऱ्या कारखान्याला अचानक आग लागल्याने औद्योगिक वसाहतीतील परिसरात एकच भीतीचं वातावरण पसरलं आहे. या कारखान्यातील आवारामध्ये कचऱ्याचा ढीग होता. या ठिकाणी अचानक आगीने रौद्ररूप धारण केले आणि शेजारी असलेल्या प्लास्टिक बनवणाऱ्या कंपनीला आग लागली.
या आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले होते. त्यामुळे मुसळगाव औद्योगिक वसाहतीत काही प्रमाणात भितीचं वातावरण पसरले होते. मात्र तात्काळ घटनास्थळी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले आणि ही आग विझवण्यासाठी त्यांनी शर्तीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली.
दरम्यान, घटनास्थळी सिन्नर एमआयडीसी पोलीस यांनी धाव घेत तात्काळ अग्निशमन दलाला पाचरण केलं होतं. परिसरातील नागरिकांनी देखील आग विझवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले. आग आटोक्यात आणण्यास अग्निशमन दलाला यश आले असून नेमकं आगीत किती नुकसान झाले आहे, याची खात्रीशीर माहिती समोर आली नाही. पोलिसांनी आग आटोक्यात आणल्यानंतर पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे. मात्र सिन्नर एमआयडीसी परिसरात आगीच्या घटना वारंवार होत असल्यामुळे नगर परिषदेच्या माध्यमातून अग्निशमन दलाच्या बंबांची संख्या वाढवण्यात यावी अशी मागणी आता स्थानिक प्रशासनाकडे करू लागले आहेत.