• Mon. Nov 25th, 2024
    युगांडातून दोहामार्गे नागपूरला, कस्टम विभागाला संशय, झडती घेताच धक्कादायक प्रकार समोर; काय घडलं?

    जितेंद्र खापरे, नागपूर : नागपूर विमानतळावर कस्टम विभागाने मोठी कारवाई केली आहे. कस्टम विभागाने एका व्यक्तीला २ किलो ९३७ ग्रॅम ड्रग्जसह अटक केली आहे. या संपूर्ण ड्रग्सची एकूण किंमत ८.८१ कोटी रुपये आहे. अटक करण्यात आलेला आरोपी हा चेन्नई, तामिळनाडू येथील रहिवासी आहे. युगांडातून दोहामार्गे तो नागपूरला पोहोचला होता. सीमाशुल्क विभागाच्या अमली पदार्थ विरोधी मोहिमेतील ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई आहे.

    एक व्यक्ती ड्रग्ज घेऊन येत असल्याची गुप्त माहिती कस्टम विभागाला मिळाली होती. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला. कतार एअरवेजचे फ्लाइट क्रमांक QR-590 पहाटे नागपूर विमानतळावर पोहोचले. ग्रीन चॅनेलवरून जात असताना पॅक्स नावाच्या व्यक्तीला संशयावरुन थांबवून त्याची झडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे ८ कोटी ८१ लाख रुपये किमतीचे २ किलो ९३७ ग्रॅम ड्रग्ज सापडले.
    दिल्लीच्या बाजारात निष्ठा विकून पवारांची साथ सोडणारा मी नाही, रोहित पवारांची तटकरेंवर सडकून टीका
    नागपूर विमानतळावरील अधिकाऱ्यांना आरोपी प्रवाशाचे असामान्य वर्तन लक्षात आले. त्यामुळे अधिकाऱ्यांनी त्याची कसून चौकशी केली. ज्यामध्ये त्याच्या सामानात एक डमी प्रोपेलर आणि दोन प्लेट आकाराच्या डिस्कसह संशयास्पद वस्तू सापडल्या. डमी प्रोपेलर आणि डिस्क तपासणीसाठी उघडली असता त्यात पांढऱ्या आणि पिवळ्या पावडरने भरलेल्या आढळल्या.
    एका मताने पडलेलं अटलबिहारी वाजपेयी सरकार, कोण होते ते खासदार ज्यांच्यामुळे कोसळलेलं १३ महिन्यांचं सरकार

    लोकसभा निवडणूक लढवण्याबाबत प्रश्न, गोविंदानं स्पष्टच सांगितलं

    ड्रग डिटेक्शन किटच्या सहाय्याने चाचणी केली असता, मेथाक्वॉलोन हे पांढरे आणि पिवळे पावडर असल्याचे आढळून आले. पॅक्सला नार्कोटिक ड्रग्ज अँड सायकोट्रॉपिक पदार्थ कायदा, १९८५च्या तरतुदीनुसार अटक करण्यात आली आहे. पुढील तपासासाठी आरोपीला सोनेगाव पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed