• Mon. Nov 25th, 2024

    ठाकरेंचा शब्द, गोडसेंसाठी ताकद लावली, आता तिसऱ्यांदा डावललं, निष्ठावंत भेटीच्या प्रतिक्षेत

    ठाकरेंचा शब्द, गोडसेंसाठी ताकद लावली, आता तिसऱ्यांदा डावललं, निष्ठावंत भेटीच्या प्रतिक्षेत

    नाशिक : साल २०१४… मोदी लाटेत निवडणूक लढण्यासाठी प्रत्येक जण इच्छुक असताना नाशिकमधून उद्धव ठाकरेंनी महायुतीचा उमेदवार म्हणून मनसेतून आलेल्या हेमंत गोडसेंना संधी दिली.. पण निवडणुकीसाठी सगळी तयारी करुन बसलेल्या एका निष्ठावंत शिवसैनिकाला डावलून जाहीर झालेल्या तिकिटामुळे वातावरण तापलं.. अखेर ठाकरेंनी स्वतः पुढाकार घेतला आणि निष्ठावंताची समजूत काढली.. पुढे २०१९ ची निवडणूक आली आणि पुन्हा एकदा २०१४ ला जे घडलं तेच झालं.. ठाकरेंनी दुसऱ्यांदा शब्द दिला आणि निष्ठावंताने तलवार म्यान करुन पुन्हा एकदा हेमंत गोडसेंसाठी आपली ताकद उभा केली.. पण २०२४ ला तिसऱ्यांदाही निष्ठेचं फळ न मिळाल्यानंतर ठाकरेंचा शिवसैनिक मनापासून दुखावलाय आणि उद्धव ठाकरेंची भेट घेऊन भूमिका जाहीर करण्यासाठी अतुर झालाय..

    एका आठवड्यापासून ठाकरेंच्या भेटीसाठी अतुर असलेल्या या शिवसैनिकाच्या मनात नेमकं चाललंय काय आणि २०२४ तीन वेळा डावलूनही हा शिवसैनिक ठाकरेंच्या शब्दावर पुन्हा एकदा विश्वास ठेवणार का, याची उत्सुकता आहे.
    मोहिते पाटलांची शरद पवारांना साद, गुढीपाडव्याला ‘तुतारी’ फुंकणार? माढ्यातून उमेदवारीची चिन्हं
    शिवसेना फुटल्यानंतर शेकडो नेते एकनाथ शिंदेंसोबत गेले.. नाशिकसारखा बालेकिल्लाही शिंदेंनी भेदला, पण उद्धव ठाकरेंसोबत जे एकनिष्ठ राहिले, त्यात एक आहेत ते विजय करंजकर.. गेल्या तीन दशकांपासून कट्टर शिवसैनिक असलेल्या करंजकरांचं नाव २०१४ आणि २०१९ च्या लोकसभेला जसं चर्चेत आलं, तसंच ते यावेळीही आलंय.. कारण, नाशिकमधून राजाभाऊ वाजेंना तिकीट जाहीर झाल्यापासून करंजकरांनी वेट अँड वॉचची भूमिका घेऊन उद्धव ठाकरेंच्या भेटीसाठी प्रयत्न सुरु केलेत.. करंजकरांची स्टोरी पाहिली तर राजकारणात खरंच निष्ठेला फळ असतं का असाही प्रश्न पडतो..
    वडिलांनी माजी मुख्यमंत्र्यांना पाडलं, लेकीनं २५ वर्षे अस्तित्व राखलं, गवळींची नेमकी ताकद किती?
    विजय करंजकर जवळपास गेल्या १० वर्षांपासून जिल्हाप्रमुख
    भगूर नगरपरिषदेवर एकहाती सत्ता, स्वतः नगराध्यक्ष राहिले
    २०१४ आणि २०१९ च्याही लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक
    जिल्ह्यात कायम हेमंत गोडसे विरुद्ध विजय करंजकर संघर्ष
    आक्रमक बाणा आणि दशकभरात जिल्ह्यातील संघटनावर पकड यामुळे करंजकर यांचं नाव आघाडीवर होतं
    २०१४ ला करंजकरांनी तिकिटासाठी प्रयत्न केले, पण ठाकरेंनी समजूत काढली, गोडसेंना तिकीट जाहीर
    २०१९ लाही करंजकर इच्छुक, पण ठाकरेंनी तुमच्या त्यागाची पक्ष दखल घेईल असा शब्द देऊन पुन्हा समजूत घातली
    दोन्ही निवडणुकीत करंजकरांनी ठाकरेंच्या शब्दानंतर हेमंत गोडसेंसोबत वैर असूनही त्यांचा प्रचार केला
    गोडसेंनी २०१४ ला भुजबळांना, तर २०१९ ला समीर भुजबळांना पाडलं
    Read Latest Maharashtra News Updates And Marathi News

    नाशिकची जबाबदारी सध्या संजय राऊत पाहतायत आणि तिथे कुणाला संधी द्यायची याचा निर्णय हा राऊतांनीच घेतला.. पण या निर्णयात करंजकरांसारखा निष्ठावंत डावलल्यामुळे त्यांचे समर्थक शिवसैनिकही नाराज झाले.. अखेर करंजकरांनी आपलं म्हणणं थेट उद्धव ठाकरेंपर्यंत पोहोचवण्यासाठी भेटीची वेळ मागितली, पण त्यांना अजून बोलवणं न आल्यामुळे शिवसैनिकांमधली अस्वस्थता अजून वाढलीय. राजाभाऊ वाजे हे महाविकास आघाडीचे उमेदवार असल्यामुळे एकीकडे प्रचार सुरु झालाय, तर दुसरीकडे करंजकरांसारखा डॅशिंग नेता अजूनही सायलेंट मोडवर आहे..

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed