• Mon. Nov 25th, 2024

    महाराष्ट्रातील या मतदारसंघातून बंडाची तयारी सुरू? इच्छुक उमेदवाराने दिला अल्टिमेटम- जाहीर केलेला उमेदवार बदला किंवा मैत्रीपूर्ण लढा

    महाराष्ट्रातील या मतदारसंघातून बंडाची तयारी सुरू? इच्छुक उमेदवाराने दिला अल्टिमेटम- जाहीर केलेला उमेदवार बदला किंवा मैत्रीपूर्ण लढा

    शिर्डी (मोबीन खान) : अनेक वर्षांपासून शिर्डी लोकसभेच्या उमेदवारीची तयारी करणाऱ्या काँग्रेसच्या उत्कर्षा रूपवते यांनी शिर्डीच्या जागेसाठी अजूनही आग्रह सोडलेला नाही. ठाकरे गटाने जाहीर केलेल्या उमेदवाराबद्दल प्रचंड नाराजी असून काँग्रेसने इथे उमेदवार देऊन मैत्रीपूर्ण लढत द्यावी अशी मागणी केलीय. तसेच रूपवते यांनी काही दिवसांपूर्वी वंचितचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतल्याने ते वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती त्यावर बोलताना ते म्हणाल्या की, प्रकाश आंबेडकर यांची भेट फक्त मार्गदर्शन घेण्यासाठी होती. मी काँग्रेसमध्येच आहे, परंतु महाविकास आघाडीने शिर्डीच्या उमेदवारी बाबत पुनर्विचार करावा अन्यथा वेगळा विचार करू, असा प्रस्ताव देखील त्यांनी मविआ समोर ठेवला आहे.

    महाविकास आघाडीत अजून अनेक ठिकाणी उमेदवारीवरून तीढा असल्याचे समोर येत आहे.काँग्रेसकडून शिर्डीच्या जागेसाठी आग्रही असलेल्या उत्कर्षा रूपवते यांनी बंडाचे हत्यार उपसले आहे. ठाकरेंनी दिलेल्या उमेदवाराबद्दल मतदारसंघात नाराजी असून ज्यांनी काँग्रेस आणि शिवसेनेशी गद्दारी केलीय त्यांनाच पुन्हा उमेदवारी दिल्याने पक्षान्तर्गत आणि जनतेतही नाराजी आहे.त्यामुळे एकतर उमेदवार बदलला नाहीतर भिवंडी आणि सांगली प्रमाणे मैत्रीपूर्ण लढत व्हावी, अशी मागणी उत्कर्षा रूपवते यांनी केलीय.

    काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी न्याय द्यावा

    एकीकडे काँग्रेस पक्षाच्या वतीने देशभरात भारत जोडो न्याय यात्रा काढण्यात आली त्या माध्यमातून कार्यकर्त्यांपासून मतदारांना जोडण्याचा प्रयत्न काँग्रेस पक्षाकडून करण्यात आलेला आहे. मात्र अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षात काम करणाऱ्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर अन्याय होत असून निष्ठावंतांना न्याय देण्यासाठी काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी पुढाकार घ्यावा, असे देखील उत्कर्षा रूपवते यांनी म्हटले आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed