कोण आहेत अर्चना पाटील?
राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यापूर्वी उस्मानाबाद जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा होत्या. सध्या त्या सक्रीय राजकारणात नव्हत्या, मात्र आता लोकसभेच्या आखाड्यातून त्या शड्डू ठोकतील.
राणा जगजितसिंह पाटलांनी २०१९ ची लोकसभा निवडणूक राष्ट्रवादीच्या तिकीटावर लढवली होती. शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात राणा ताकदीने लढले, पण त्यांना ओमराजेंनी धूळ चारली होती. मात्र लोकसभेनंतर राणा जगजितसिंहांनी भाजपमध्ये प्रवेश करून विधानसभेची निवडणूक लढले. तुळजापूर मतदारसंघातून ते विधानसभेवर गेले.
राणा जगजितसिंह पाटील आणि ओमराजे निंबाळकर हे नात्याने चुलत बंधू आहेत. मागील वेळी दोन भावांमध्ये लढत झाली होती, यंदा दीर-भावजयीमध्ये लढत होत आहे. आपल्या पतीच्या पराभवाचा बदला घेण्याचा अर्चना पाटील पुरेपूर प्रयत्न करतील.
तुम्हाला बाहेरून उमेदवार आयात का करावा लागला?
तुम्हाला बाहेरच्या पक्षातून उमेदवार का आयात करावा लागला? असा प्रश्न पत्रकारांनी सुनील तटकरे यांना विचारला, त्यावर ते म्हणाले, “आपण देशात आणि राज्यात पाहिले तर उमेदवारांची निवडून येण्याची क्षमताच विचारात घेतली जाते. या गोष्टींचा सारासार विचार करत आम्हाला राज्यात ४५ पेक्षा जास्त जागा निवडून आणण्यासाठी अर्चना पाटील यांना धाराशीवमधून उमेदवारी दिली गेली”