• Mon. Nov 25th, 2024
    ऐन उन्हाळ्यात वीज दरवाढीचा शॉक! आजपासून लाईट बिलात इतक्या रुपयांनी होणार वाढ

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : राज्यात उन्हाळ्याचे चटके बसत असताना एप्रिल महिन्याच्या बिलात ७.५० टक्के दरवाढीचा शॉक ग्राहकांना बसणार आहे. महावितरणने १ एप्रिलपासून आपल्या दरात वाढ केल्याने ग्राहकांना भुर्दंड सोसावा लागणार आहे. घरगुती वापराच्या ग्राहकांना सरासरी २५ ते ५० रुपये जादा मोजावे लागणार आहेत.महाराष्ट्र वीज वितरण कंपनीने वीज नियामक आयोगाकडे दरवाढीसाठी प्रस्ताव दिला होता. वीजनिर्मिती आणि वितरण यांच्यासाठी लागणारा खर्च व त्यातून जमा होणारी रक्कम याचा ताळमेळ साधला जात नव्हता. यामुळे वीज महामंडळाला गेल्या पाच वर्षांत ६७ हजार ६४४ कोटी रुपयांचा तोटा सहन करावा लागत होता. परिणामी, वीज वितरण कंपनीने वीज नियामक आयोगाकडे दरवाढीचा प्रस्ताव ठेवला होता. आयोगाने या प्रस्तावाची दखल घेत ७.५० टक्के वीज दरवाढीला मंजुरी दिली. या दरवाढीसोबत स्थिर आकारातही १० टक्के दरवाढ होईल.

    लाचखोरीत नाशिक विभाग आघाडीवर; मुंबई-पुण्यालाही टाकले मागे, ३ महिन्यांत ‘इतके’ लाचखोर अटकेत
    अशी होणार दरवाढ

    घरगुती मध्यमवर्गीय ग्राहक : प्रत्येक बिलामागे २५ ते ५० रुपये

    शेती पंपधारक : २० ते ३० पैसे प्रतियुनिट

    औद्यागिक ग्राहक : ३५ पैसे प्रतियुनिट

    व्यावसायिक : ५५ पैसे प्रतियुनिट

    स्थिर आकार (१ एप्रिल २०२४ पासून रुपयांमध्ये)

    वीज प्रकार पूर्वी नवीन दर

    घरगुती (सिंगल फेज) ११६ १२८

    थ्री फेज ३८५ ४२५

    वाणिज्य ग्राहक ४७० ५१७

    सार्वजनिक पाणीपुरवठा ग्राहक (दर रुपयांमध्ये)

    वीज प्रकार पूर्वी नवीन दर

    शून्य ते २० किलोवॉट ११७ १२९

    २० ते ४० किलोवॉट १४२ १५६

    ४० किलोवॉटवरील १७६ १९४

    कृषी ग्राहक (मीटर नसलले) ५ हॉर्स पॉवरपर्यंत : ४६६ ऐवजी ५६३ रुपये

    लघु औद्योगिक ग्राहक २० किलोवॉटपर्यंत : ५३० ऐवजी ५८३ रुपये

    पथदिव्यांसाठी : १२९ ऐवजी १४२ रुपये

    सरकारी कार्यालये व रुग्णालय (२० किलोवॉट) : ३८८ ऐवजी ४२७ रुपये

    अगोदरच लोक महागाईने होरपळले असताना ग्राहकांना महावितरणने दर वाढवून शॉकच दिला आहे. महावितरणला ज्या ठिकाणी वसुली होत नाही तेथे कारवाई न करता शहरी भागातील सामान्य ग्राहकांकडून ती रक्कम वसूल केली जाते. जो नियमित बील भरतो त्यालाच हा भुर्दंड आहे.

    – प्रज्ञा चव्हाण, गृहिणी

    गेल्या अनेक वर्षांपासून महावितरणला नुकसानीला सामोरे जावे लागत होते. त्यामुळे ही वीज दरवाढ नियामक आयोगाच्या निर्देशानुसार करण्यात आली आहे.

    – दीपक कुमठेकर, मुख्य अभियंता, नाशिक विभाग

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed