मुंबई : प्रस्थापित पक्षांनी लोकसभेची उमेदवारी नाकारल्यानंतर वंचित बहुजन आघाडीकडे गेलेल्या फायरब्रँड नेते वसंत मोरे यांना प्रकाश आंबेडकर यांनी नाराज केले नाही. पुणे लोकसभा मतदारसंघातून वसंत मोरे यांना वंचितने उमेदवारी जाहीर केली आहे. चार दिवसांपूर्वी वसंत मोरे यांनी ‘राजगृह’ प्रकाश आंबेडकर यांची भेट घेऊन लोकसभेच्या उमेदवारीवर चर्चा केली होती. भेटीनंतर प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यातील समीकरणे पाहून आज मोरे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. पुण्यातून काँग्रेसकडून रवींद्र धंगेकर तर भाजपकडून मुरलीधर मोहोळ लोकसभेचे उमेदवार आहेत, आता तात्यांच्या रुपाने पुण्यात तिरंगी लढत होईल. दुसरीकडे वंचितने बारामतीमधून सुप्रिया सुळे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय. तर इकडे शिरूरमधून मंगलदास बांदल यांनाही वंचितने कोल्हे-आढळरावांच्या विरोधात निवडणुकीच्या आखाड्यात उतरवलंय.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला सोडचिठ्ठी देत वसंत मोरे यांनी ‘एकला चलो’चा नारा दिला आहे. पुण्यातून लोकसभा निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी काँग्रेसकडे उमेदवारीही मागितली. काँग्रेसने धंगेकर यांना उमेदवारी दिल्यानंतर त्यांनी अपक्ष निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. लोकसभा लढविण्यासाठीच ‘मनसे’तून बाहेर पडलो असून लोकसभा लढणारच अशी भूमिका त्यांनी घेतली. याचा कारणास्तव त्यांनी ‘वंचित’च्या पर्यायाची चाचपणी केली. ‘वंचित’चे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची त्यांनी मुंबईत राजगृहवर जाऊन भेट घेतली, दोघांमध्ये तासभर चर्चा झाली.
वसंत मोरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती. मोरे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु पुण्याची लोकसभेची जागा काँग्रेसकडे असल्याने शरद पवार त्यांना उमेदवारीचा शब्द देऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचा पर्याय बाजूला ठेवून वंचितकडे जाण्याचा निर्णय घेतला.‘नव्या समीकरणाची सुरुवात’, आंबेडकरांनी दिले होते तात्यांचे उमेदवारीचे संकेत
वसंत मोरे यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेतली होती. मोरे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश करतील, अशी अटकळ बांधली जात होती. परंतु पुण्याची लोकसभेची जागा काँग्रेसकडे असल्याने शरद पवार त्यांना उमेदवारीचा शब्द देऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादीचा पर्याय बाजूला ठेवून वंचितकडे जाण्याचा निर्णय घेतला.
‘नव्या समीकरणाची सुरुवात’, आंबेडकरांनी दिले होते तात्यांचे उमेदवारीचे संकेत
राज्यात नवीन राजकीय समीकरण मांडू इच्छित आहे. महाराष्ट्रात नव्या राजकारणाची सुरुवात कशी होईल, ती कोण करणार, याबाबत अधिकृतरित्या काही दिवसांतच सर्वांना माहिती देण्यात येईल, असे म्हणत आंबेडकरांनी वसंत मोरे यांच्या उमेदवारीचे संकेत दिले होते.
वंचितकडून पाच उमेदवारांची घोषणा
- अविनाश बोसिकर (नांदेड )
- बाबासाहेब भुजंगराव उगाळे (परभणी )
- अफसर खान (औरंगाबाद )
- वसंत मोरे (पुणे )
- मंगलदास बांदल (शिरुर )