पंतप्रधान मोदींची विचारधारा देशाच्या हिताची नाही. नरेंद्र मोदी यांचा विरोधात भूमिका घेणाऱ्यांना तुरुंगात टाकले जात आहे. अरविंद केजरीवाल आणि हेमंत सोरेन यांना केलेली अटक हे संविधानावरील हल्ला आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्र्यांना धमकावले होते. पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आणि इतर राज्यातील मुख्यमंत्री, त्यांना तुरुंगात टाकण्याचे काम हे सरकार करत आहे. देशात अघोषित आणीबाणीची स्थिती आहे. केजरीवाल आणि सोरेन यांची अटक म्हणजे लोकशाहीवर हल्ला आहे.
…विरोधी पक्षात बसावे लागले
भाजपने अजित पवारांनाच आपल्या गोटात घेतलेच नाही तर शरद पवार यांच्याकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे निवडणूक चिन्ह हिसकावून घेतले. या गोष्टींमुळे महाराष्ट्राच्या राजकारणातील शरद पवार यांचा कार्यकाळ संपला आहे, असे बोलले जात होते. याबाबत शरद पवार यांना विचारले असता ते म्हणाले, महाराष्ट्रातील एक नेता आहे. ते आता सरकारमध्ये उपमुख्यमंत्री आहे. पाच वर्षांपूर्वी ते प्रत्येक सभेत म्हणायचे की, शरद पवार संपले. मात्र निवडणुकीच्या निकालानंतर परिस्थिती अशी बनली की, पुढची अडीच वर्षे शरद पवारांच्या सहकाऱ्यांनी सरकार चालवले आणि त्या नेत्याला विरोधी पक्षात बसावे लागले.
बारामती लोकसभा मतदारसंघाबाबत विचारण्यात आले असता शरद पवार म्हणाले की, निवडणुकीची प्रोसेस सुरू झाली नाही, इलेक्शन सुरू झालेली नाही, मतदान व्हायचे आहे. येथील लोकांचा कल मतदानानंतरच कळेल. याआधी सुप्रिया सुळे बारामतीतून विजयी झाल्या होत्या. यापुढेही सुप्रिय सुळेच जिंकतील, असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.