• Sat. Sep 21st, 2024

शिवसेनेचा एक उमेदवार बदलला जाणार? शिंदेंच्या शिलेदाराकडून स्पष्ट संकेत, कोणाचा पत्ता कट?

शिवसेनेचा एक उमेदवार बदलला जाणार? शिंदेंच्या शिलेदाराकडून स्पष्ट संकेत, कोणाचा पत्ता कट?

मुंबई: लोकसभा निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेनं गेल्या आठवड्यात ८ उमेदवार जाहीर केले. शिंदेंनी ७ जागांवर विद्यमान खासदारांना संधी दिली. तर एका जागेवर नव्या चेहऱ्याला संधी दिली. शिवसेनेनं जाहीर केलेल्या ८ पैकी एक उमेदवार बदलला जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे याबद्दलचे संकेत शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी दिले.

एखादा उमेदवार कमजोर वाटत असल्यास तो बदलण्याचा अधिकार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आहे. एखादा उमेदवार बदलला जाण्याची शक्यता नाकारता येत नाही, असं शिरसाट म्हणाले. मराठवाडा किंवा पश्चिम महाराष्ट्रातील एखादा उमेदवार बदलला जाऊ शकतो, असं शिरसाट यांनी म्हटलं. हिंगोली किंवा हातकणंगलेतील उमेदवार बदलला जाण्याची दाट शक्यता आहे.
वंचितचा मविआला धसका; कोणकोणत्या जागांवर बसू शकतो फटका? काय सांगते आकडेवारी?
दक्षिण मध्य मुंबईतून राहुल शेवाळे, कोल्हापुरातून संजय मंडलिक, शिर्डीतून सदाशिव लोखंडे, बुलढाण्यामधून प्रतापराव जाधव, हिंगोलीतून हेमंत पाटील, मावळमधून श्रीरंग बारणे रामटेकमधून राजू पारवे आणि हातकणंगलेतून धैर्यशील माने यांना शिवसेनेनं उमेदवारी दिली आहे. यातील रामटेक वगळता अन्य सर्व मतदारसंघांमध्ये शिंदेंनी विद्यमान खासदारांनाच पुन्हा तिकिटं दिली आहेत.
नाही मिळाली शिर्डीची गादी, त्याबदल्यात भाजपकडून काय मिळणार? आठवलेंनी वाचली भलीमोठी यादी
हिंगोली किंवा हातकणंगलेच्या खासदाराचा पत्ता कट?
हिंगोलीतून हेमंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पण त्यांच्या उमेदवारीला भाजपचा विरोध आहे. हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांचं नाव डेंजर झोनमध्ये होतं. त्यांना उमेदवारी दिली जाऊ नये, इथे उमेदवार बदलण्यात यावा, अशा सूचना भाजपकडून करण्यात आल्या होत्या. पण शिंदेंनी माने यांनाच पुन्हा संधी दिली.

मी ऐकत नव्हतो, म्हणून मुख्यमंत्री रागावले; एका फोननंतर विजय शिवतारेंचं बंड झालं थंड, बारामतीतून माघार

पाच खासदार वेटिंगवर, धाकधूक वाढली
वायव्य मुंबई, कल्याण, यवतमाळ वाशिम, नाशिक, पालघरसाठी शिंदेंनी उमेदवारांची घोषणा केलेली नाही. पालघरचे खासदार राजेंद्र गावित भाजपकडून लढण्यास उत्सुक आहेत. तर नाशिकच्या जागेवर शिवसेनेसोबत भाजप, राष्ट्रवादीचा दावा आहे. ही जागा राष्ट्रवादीला सुटू शकते. कल्याणमधून मुख्यमंत्री शिंदे यांचे चिरंजीव श्रीकांत शिंदे खासदार आहेत. पण त्यांचीही उमेदवारी अद्याप जाहीर झालेली नाही. भाजपनं ठाणे, कल्याणवर दावा सांगितल्यानं शिंदेंची कोंडी झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed