• Mon. Nov 25th, 2024
    महिनाभरात लग्न, शॉपिंगला गेले अन् वाटेत अनर्थ घडला, नवरदेवासह बहीण-भाचीचा दुर्दैवी अंत

    बीड: महिनाभरावर आलेल्या लग्नासाठी बस्ता बांधून बहीण आणि चिमुकल्या भाचीसह गावाकडे निघालेल्या तरुणाच्या दुचाकीला एसटी बसने दिली. या भीषण अपघातात भावी नवरदेव तरुणासह त्याची बहीण आणि भाचीचा जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात अंबाजोगाईजवळ वाघाळा पाटीजवळ रविवारी (३१ मार्च) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास झाला.

    लातूर जिल्ह्यातील बिटरगाव तांडा तालुका रेणापूर येथील सेवालाल पंडित राठोड (वय २१) या तरुणाचा येत्या २८ एप्रिल रोजी विवाह होणार होता. या विवाहाची सध्या जय्यत तयारी सुरू होती. लग्नाचा बस्ता बांधण्यासाठी सेवालाल रविवार ३१ मार्च रोजी त्याची बहीण दिपाली सुनील जाधव (वय २०) आणि एक वर्षाची भाची त्रिशा यांना घेऊन अंबाजोगाईला आला होता.
    नाशकात गुन्हेगारी थांबेना, १९ वर्षीय तरुणाचा अंगावर काटा आणणारा अंत, पाहा नेमकं काय घडलं?
    लग्नाचा बस्ता बांधून बहीण आणि भाचीला घेऊन सेवालाल सायंकाळी दुचाकीवरून गावाकडे परत निघाला होता. ते वाघाळा पाटीजवळ आले असता समोरून येणाऱ्या लातूर – छत्रपती संभाजीनगर बसने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात बसखाली दुचाकी फरफटत जाऊन सेवालाल, बहीण दिपाली आणि भाची त्रिशा यांचा जागीच मृत्यू झाला.

    सेवालाल आणि दिपाली हे त्यांच्या मातापित्यांचे एकुलते एक अपत्य होते. अपघाताची माहिती मिळताच नातेवाईकांनी स्वाराती रुग्णालयात धाव घेतली. यावेळी नातवाईकांनी मन हेलावणारा आक्रोश केला. अवघ्या महिनाभरावर लग्न राहिलं होतं आणि त्याचं घरात शोक पसरला आहे. हे पाहून अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.

    मुंबई गोवा महामार्गा भीषण अपघात: भरधाव वाहनाची धडक, मॉर्निंग वॉकसाठी गेलेल्या व्यक्तीचा जागीच मृत्यू

    चिमुकलीसह सख्खे-बहीण भाऊ हे लग्नाची तयारी करत असताना अशाप्रकारे अपघातात मृत्यूमुखी पडल्याने कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या मृत्यूची बातमी घरी पोहोचताच नातेवाइकांनी आक्रोश केला. या दुर्दैवी घटनेने जिल्हाभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed