Wadala Custodial Death: विजयच्या मृत्यूनंतर परिसरात जनआंदोलनही झाले होते. त्या पार्श्वभूमीवर, राज्य सरकारने तपास ‘एसआयटी’कडे सोपवला होता.
सहा वर्षांपूर्वीच्या या प्रकरणात, वडाळा ट्रक टर्मिनल पोलिसांच्या मारहाणीत विजय सिंग या २६ वर्षीय तरुणाचा पोलिस कोठडीत मृत्यू झाल्याचा आरोप होता.
Summer Special Trains: उन्हाळ्याच्या सुट्टीत फिरायला जाताय? मुंबई-कोकण मार्गावर धावणार विशेष एक्स्प्रेस, असं आहे नियोजन
‘अँटॉप हिल परिसरात विजयच्या दुचाकीच्या हेडलाइटचा प्रकाश चेहऱ्यावर पडल्याने आफरीन व दशरथ या जोडप्याने विजयला मारहाण केली. त्याचवेळी वडाळा ट्रक टर्मिनसचे गस्तीवर असलेले पोलिसांचे वाहन तिथे आले. त्यांनी सर्वांना पोलिस ठाण्यात नेले. आफरीन व दशरथने विजयला मारहाण केली होती. त्यानंतर पोलिसांनीही विजयला मारहाण केली. लॉकअपमध्ये असताना छातीत दुखत असल्याची तक्रार वारंवार केल्यानंतरही पोलिसांनी नाटक करत असल्याचे म्हणत विजयकडे दुर्लक्ष केले. त्याने पाणी मागितले असताना पोलिसांनी पाणी दिले नाही. त्यानंतर त्याला बाकड्यावर बसवण्यात आले असताना तो अचानक खाली कोसळला. मग पोलिसांनी विजयला पोलिस व्हॅनमधून रुग्णालयात नेण्याऐवजी, कुटुंबीयांनाच ओला टॅक्सीने शीव रुग्णालयात न्यावे लागले. मात्र, तिथे त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले’, असा आरोप याचिकाकर्त्यांनी ॲड. विनय नायर यांच्यातर्फे केलेल्या फौजदारी रिट याचिकेत केला होता.
Ritu Tawde: मुंबईच्या महापौर रितू तावडे अडचणीत; आरोपनिश्चितीसाठी पुरेसे पुरावे असल्याचं सांगत कोर्टाने अर्ज फेटाळला!
त्या ‘एसआयटी’ने तपासाअंती पोलिसांना ‘क्लीन चीट’ दिली होती. मात्र, विजयच्या कुटुंबीयांनी सीबीआय तपास आणि पोलिसांवरील कारवाईची मागणी लावून धरत ‘एसआयटी’च्या तपासातील त्रुटी दाखवून दिल्या होत्या. ते लक्षात घेऊन न्या. रवींद्र घुगे यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठाने ११ सप्टेंबर २०२५ रोजीच्या आदेशाने तपास सीबीआयकडे सोपवला होता. ‘सर्व संबंधित साक्षीदारांचे जबाब, विजयच्या पार्थिवावरील शवचिकित्सा, त्याच्या हृदयाशी संबंधित केईएम रुग्णालय व जे. जे. रुग्णालयातील वैद्यकीय तज्ज्ञांचे निष्कर्ष या साऱ्याचा विचार केल्यानंतर अधिक तपास होणे आवश्यक दिसत आहे’, असे निरीक्षण नोंदवत खंडपीठाने सीबीआयला आदेश दिला होता.
Maharashtra Land Records Scam : जमिनींच्या फेरफार प्रकरणात सरकार अॅक्शन मोडमध्ये; राज्यभर होणार तपास, दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे
साक्षीदारांचे जबाब, पुराव्यांचा विचार
याअनुषंगाने सीबीआयने सखोल तपास केला. तसेच विजयच्या विविध वैद्यकीय अहवालांच्या अनुषंगाने नवी दिल्लीतील ‘एम्स’च्या वैद्यकीय मंडळाकडून अहवाल मिळवला. अखेरीस साक्षीदारांचे जबाब व अन्य पुरावे, वैद्यकीय अहवाल व तत्सम पुराव्यांचा विचार करून विजयचा मृत्यू हा पोलिसांच्या छळवणुकीत झाला नसल्याचा निष्कर्ष आपल्या अंतिम अहवालात नोंदवला. न्या. भारती डांगरे व न्या. मंजुषा देशपांडे यांच्या खंडपीठाने हा अहवाल स्वीकारला. तसेच ‘याचिकाकर्त्यांच्या आरोपांत तथ्य दिसत नाही आणि पोलिसांविरोधात कोणताही गुन्हा दिसत नाही’, असे निरीक्षण नोंदवत याचिका फेटाळून लावली.
