• Mon. Nov 25th, 2024

    जेलर रिटायर झाल्यानं पोलिसांची पार्टी; कारागृहाबाहेर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अडीच तास धिंगाणा

    जेलर रिटायर झाल्यानं पोलिसांची पार्टी; कारागृहाबाहेर अधिकारी, कर्मचाऱ्यांचा अडीच तास धिंगाणा

    छत्रपती संभाजीनगर: देशभरातील कुख्यात गुन्हेगार असलेल्या हर्सूल कारागृहाबाहेर सुरक्षेची जबाबदारी असलेल्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी मध्यरात्री बेफाम होत पार्टी केली. कारागृह अधीक्षक जयंत नाईक यांच्या सेवानिवृत्तीच्या सोहळ्याच्या निमित्ताने हिंदी मराठी गाणी डीजेवर वाजवत मद्याचा आस्वाद घेत अधिकारी कर्मचाऱ्यांनी धिंगाणा केला. विशेष म्हणजे यातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी पोलीस वर्दीवरच तब्बल अडीच तास धिंगाणा घालत गृह विभागाच्या नियमांना केराची टोपली दाखवली. दरम्यान या अधिकारी कर्मचाऱ्यांच्या या गोंधळाचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे.

    कारागृह अधीक्षक जयंत नाईक यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त पोलिसांकडून पार्टीचं आयोजन करण्यात आले होते. हर्सूल कारागृहाबाहेरच पोलीस डीजेच्या तालावर थिरकले. अनेक पोलिसांनी वर्दीवरच ठेका धरला आणि बेफाम नाचले. यावेळी काही पोलीस स्नो स्प्रेचा फवारा करत होते. रात्री अडीच तास पोलिसांचा धांगडधिंगा सुरू होता. गृह विभागाचे नियम पोलिसांनीच धाब्यावर बसवल्याचा प्रकार यावेळी पाहायला मिळाला. ज्यांच्यावर नियम पाळायची जबाबदारी तेच पोलीस नियम मोडत असल्याचे चित्र यावेळी पाहायला मिळाले. डीजेच्या तालावर बेफाम नाचणाऱ्या पोलिसांचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *