• Tue. Jun 16th, 2026

    धक्कादायक! धावत्या रिक्षात विद्यार्थीनीसोबत अश्लील चाळे, नातेवाईकांनी तरुणाला चोपलं

    धक्कादायक! धावत्या रिक्षात विद्यार्थीनीसोबत अश्लील चाळे, नातेवाईकांनी तरुणाला चोपलं

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर: धावत्या ऑटोत विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या युवकाला पकडून नागरिकांनी चांगलाच चोप देत अजनी पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून युवकाला अटक केली.कुणाल अनिल लोंदे (वय ३२, रा. विद्यानगर, नंदनवन) असे अटकेतील युवकाचे नाव आहे. तो एका खासगी कंपनीत काम करतो. २०वर्षीय विद्यार्थिनी अभियांत्रिकीच्या अभ्यासक्रमाला आहे. ती अजनी पोलिस ठाण्याच्या हद्दीत राहते. ऑटोने कॉलेजमधून घरी ये-जा करते. जानेवारीत ऑटोने ती घरी यायला निघाली. यावेळी कुणालही ऑटोत बसला. त्याने तिची छेड काढली. विद्यार्थिनीने याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर काही दिवसांनी तो पुन्हा ऑटोत बसला व विद्यार्थिनीशी अश्लील चाळे केले. विद्यार्थिनीने नातेवाइकांना माहिती दिली. ‘यानंतर तो ऑटोत बसल्यास सांग’, असे नातेवाईक तिला म्हणाले.

    शाळकरी मुलींची छेड काढलेल्या रोड रोमिओला हिंगोली करा पोलीस ठाणं गाठल, पोलिसांसमोर राडा

    शुक्रवारी सायंकाळी विद्यार्थिनी ऑटोने घरी यायला निघाली. कुणालही ऑटोत बसला. त्याने विद्यार्थिनीची छेड काढायला सुरुवात केली. विद्यार्थिनीने नातेवाइकांना व्हॉट्सअॅपवर माहिती दिली. तिचे नातेवाईक मानेवाडा चौकात पोहोचले. तेथे ऑटो थांबताच नातेवाईक पोहोचले. नातेवाइकांना बघताच कुणाल पळायला लागला. नातेवाइकांनी पाठलाग सुरू केला. नागरिकांनी कुणालला पकडले व चोप द्यायला सुरुवात केली. याबाबत माहिती मिळताच अजनी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजानन चामटे, उपनिरीक्षक पंकज बावने यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी नागरिकांच्या तावडीतून कुणालची सुटका केल्याने अनर्थ टळला. पोलिसांनी गुन्हा दाखल करून कुणालला अटक केली.

    मत्स्यव्यवसाय व बंदरे विभागाच्या विकासकामांना वेग देण्यावर भर – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे – महासंवाद
    रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे – महासंवाद
    अतिरिक्त प्लाझ्माचा प्रभावी वापर करून जीवनावश्यक औषधनिर्मितीचा प्रस्ताव तयार करा – वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ – महासंवाद

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed