• Mon. Nov 25th, 2024

    Gold Price: सोने पुन्हा महागले, मार्च महिन्यात दरवाढीचा नवा विक्रम, जाणून घ्या आजचा भाव

    Gold Price: सोने पुन्हा महागले, मार्च महिन्यात दरवाढीचा नवा विक्रम, जाणून घ्या आजचा भाव

    म. टा. प्रतिनिधी, नागपूर : सोन्याच्या दरात होणारी वाढ काही केल्या थांबायला तयार नाही. मार्चमध्ये दरवाढीचा नवीन विक्रम गाठत सोने प्रती दहा ग्रॅम जीएसटीविना ६८,५०० रुपयांवर पोहोचले आहे. अशीच दरवाढ सुरू राहिल्यास गुढीपाडव्याला सोन्याचा दर ७५ हजार राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

    गेल्या महिनाभरापासून सोन्याचा दर सातत्याने वाढत आहे. काही दिवसांपूर्वीच आजवरचा उच्चांकी आकडा गाठत सोने प्रती दहा ग्रॅम ६७ हजारांवर पोहोचले होते. त्याला काही दिवस लोटत नाही तोच नवा उच्चांकी आकडा सोन्याने गाठला आहे. जागतिक स्तरावरील अस्थिरता पाहता सोन्याचे दर वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. ही स्थिती पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचेही सराफा व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे येणारा गुढीपाडवा आजवरच्या सर्वाधिक सोनेदराचा ठरणार आहे. साधारणपणे, जेव्हा सोन्याचा दर वाढत असतो तेव्हा खरेदी वाढते. दर अधिक वाढेल या भावनेने आहे त्या दरामध्ये सोने खरेदी करण्याकडे बहुतांश ग्राहकांचा कल असतो. काही ग्राहक मात्र दर कमी होण्याची प्रतीक्षा करतात. ही संख्या फार नसल्याने दर वाढण्यासोबतच खरेदीदेखील वाढेल, असा विश्वास व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. तसेच वाढलेल्या दरांमुळे काही प्रमाणात लग्नकर्तव्य घरी असलेल्या ग्राहकांना महागड्या दरात सोनेविक्री करावी लागणार आहे.
    खाद्यतेल पुन्हा महागले! शेंगदाणा, सनफ्लॉवर तेलाच्या किमती वाढल्या, जाणून घ्या नवे दर
    गुंतवणूकदारांना वर्ष फायद्याचे

    सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना यंदाचे वर्ष चांगले राहील. या माध्यमातून चांगला परतावा मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याच्या दरांमध्ये १३.२ टक्क्यांनी तेजी आली आहे. भारतीय बाजारादेखील सोन्याचे दर १२.५ ते १३ टक्क्यांनी वाढले असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

    गेल्या काही दिवसांतील बदल
    ३० मार्च : ६८,५००
    २९ मार्च : ६८,५००
    २८ मार्च : ६७,५००
    २७ मार्च : ६७,०००
    २६ मार्च : ६६,९००
    २३ मार्च : ६६,४००
    २२ मार्च : ६६,५००
    २१ मार्च : ६७,२००
    २० मार्च : ६६,०००
    १९ मार्च : ६५,९००

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed