• Mon. Nov 25th, 2024
    अजित पवारांकडून काही चुका झाल्या असतील, पण…, विजय शिवतारे अचानक बॅकफूटवर

    मुंबई : अजित पवार महायुतीत आले, तरी माजी मंत्री विजय शिवतारे आणि अजित पवार यांच्यातील संघर्ष कमी व्हायचं नाव घेत नाही. विजय शिवतारे त्या पराभवाचा वचपा काढणार का? अशा राजकीय चर्चांना जोरदार उधाण आलं आहे. मात्र, आता अजित पवारांची लायकी काढणारे शिवतारे अचानक बॅकफूटवर गेले आहेत. पवार-शिवतारेंचं मनोमिलन झाल्याचं आता दिसून येत आहे. विजय शिवतारेंनी अखेर तलवार मान्य केली आहे. आपण बारामती लोकसभा निवडणूक लढवणार नसल्याची घोषणा त्यांनी केली. महायुती आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अडचणीत येऊ नयेत म्हणून माघार घेत असल्याची सारवासारव शिवतारेंनी केली. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.”शिवतारे म्हणाले की, अजित पवारांच्या हाताने काही चुका झाल्या असतील, पण पंतप्रधान नरेंद्र मोदींचे हात बळकट करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलाय. सुनेत्रा वहिनींना आम्ही बहुमताने निवडून आणू. साडे पाच लाख मतं पवार विरोधी आहेत. पण यातील एक पवार पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी आहेत. एक पवार आमच्याकडे आहेत. त्यामुळं ही साडेपाच लाख अजित दादांना मिळतील. आम्ही त्यांना समजावून सांगू. आमचे वरिष्ठ नेते त्यांना सांगतीलच”, असं शिवतारेंनी पत्रकार परिषदेत म्हटलंय.
    कंगना मंडीतून, तर हेमा मालिनी मथुरेतून; लोकसभा निवडणुकीच्या रिंगणातील १० दिग्गज कलाकार

    दरम्यान, गेल्या अनेक दिवसांपासून बारामती लोकसभा मतदारसंघाकडे अनेकांच्या नजरा खिळल्या आहेत. विजय शिवतारे बारामती मतदारसंघामध्ये गेल्या काही दिवसांपासून फिरत होते. बारामती लोकसभा मतदारसंघ कोणाचा सातबारा आहे का?, असा सवाल देखील त्यांनी एका सभेमध्ये केला होता. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीसाठी ६ ते ७ तास थांबले होते. त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत घातली होती. मात्र शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम होते.

    मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर काल बैठक झाली यावेळी बैठकीसाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विजय शिवतारे हे एकत्र आले होते. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार आणि विजय शिवतारे यांच्यात वाद पाहायला मिळत होता. शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर अनेकदा टीका केली. राजकारणामध्ये कधी काय होईल याचा नेम नाही. कट्टर मित्र कधी शत्रू होतील आणि शत्रू कधी कट्टर मित्र होतील याचा नेम नाही. असंच काहीसं वर्षा बंगल्याच्या कालच्या बैठकीमध्ये घडलं आहे. या बैठकीमध्ये विजय शिवतारे यांनी मवाळ भूमिका घेतली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *