• Wed. Nov 13th, 2024

    शरद पवार यांच्या पक्षाची पहिली यादी जाहीर; ५ उमेदवारांमध्ये सुप्रिया सुळे, कोल्हे आणि निलेश लंकेंचा समावेश

    शरद पवार यांच्या पक्षाची पहिली यादी जाहीर; ५ उमेदवारांमध्ये सुप्रिया सुळे, कोल्हे आणि निलेश लंकेंचा समावेश

    मुंबई: लोकसभा निवडणूक २०२४साठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी आज शनिवारी जाहीर झाली आहे. शरद पवार यांच्या पक्षाने पहिल्या यादीत पाच उमेदवारांची घोषणा केली आहे. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी या उमेदवारांची घोषणा केली. पक्षाच्या पहिल्या यादीत दिंडोरीतून भास्कर भगरे, बारामतीतून तिसऱ्यांदा सुप्रिया सुळे, वर्धेतून अमर काळे, शिरुर म्हणून दुसऱ्यांदा डॉ.अमोल कोल्हे यांना तर अहमदनगर दक्षिण म्हणून निलेश लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. लंके यांनी कालच आमदारकीचा राजीनामा दिला होता.

    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पहिली यादी

    दिंडोरी – भास्कर भगरे
    बारामती – सुप्रिया सुळे
    वर्धा – अमर काळे
    शिरूर – डॉ. अमोल कोल्हे
    अहमदनगर दक्षिण – निलेश लंके

    पक्षाने केले ट्विट-
    राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून पहिली यादी सोशल मीडियावर शेअर करण्यात आली आहे. एक्सवर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये पक्षाने दिल्लीच्या तख्तासमोर रणशिंग फुंकण्यासाठी तुतारी सज्ज आहे असे म्हटले आहे. पाहा पक्षाने काय म्हटले आहे-

    विजयाचा निर्धार पक्का करून ‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार’ पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक २०२४ ची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्तासमोर रणशिंग फुंकण्यासाठी तुतारी सज्ज आहे!

    महाविकास आघाडीतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून याआधी पहिली यादी जाहीर करण्यात आली होती. त्याआधी काँग्रेसकडून देखील पहिली यादी जाहीर करण्यात आली होती.

    अशा होतील लढती-
    शिरुर- शिवाजीराव पाटील विरुद्ध अमोल कोल्हे
    दिंडोरी- भारती पवार विरुद्ध भास्कर भगरे
    अहमदनगर- सुजय विखे पाटील विरुद्ध निलेश लंके
    वर्धा- रामदास तडस विरुद्ध अमर काळे

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed