• Sat. Sep 21st, 2024
आमदार-खासदार, मंत्री शिंदेंच्या ठाण्यातील घरी ताटकळत, मुख्यमंत्री अज्ञातस्थळी गेल्याच्या चर्चा

ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या जागांवरून महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. त्यात ठाणे, कल्याणसह रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. याबाबत चर्चा करण्यासाठी आमदार आणि खासदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. पण मुख्यमंत्र्यांशी त्यांची भेट होऊ शकली नाही, कारण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे अज्ञातस्थळी रवाना झाल्याची चर्चा होते. मात्र नक्की मुख्यमंत्री होते कुठे? असा सवाल उपस्थिती केला जात आहे.

शुक्रवारी मंत्री दादा भुसे, उदय सामंत, शंभूराज देसाई, खासदार हेमंत गोडसे, आमदार सुहास कांदे, रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी इच्छुक किरण सामंत यांनी मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी हजेरी लावली. मुख्यमंत्री अज्ञात स्थळी असल्याने तब्बल तीन तास सर्वच मंत्री आमदार खासदारांना मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यातील निवासस्थानी ताटकळत बसावं लागल्याची आता चर्चा सुरु झाली आहे.
आघाडी धर्म पाळा, मित्रपक्षांना सहकार्य करा, काँग्रेस पक्षश्रेष्ठींचा ‘आग्रही’ नेत्यांना आवर
उद्योगमंत्री उदय सामंत, त्यांचे बंधू किरण सामंत, नाशिक येथील नांदगावचे आमदार सुहास कांदे यांनी कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्याशी चर्चा केली. यावेळी शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्के हे ही उपस्थित होते.
दादांविरोधी बंडोबांना थंड करताना नाकी नऊ, देवेंद्र फडणवीस-अजित पवार मैत्रीची कसोटीRead Latest Maharashtra News Updates And Marathi News

दरम्यान राज्यात ज्या ज्या ठिकाणी शिवसेनेचे उमेदवार आहेत, त्या त्या ठिकाणी प्रचाराचे नियोजन करण्यासाठी ही बैठक होती. त्यात प्रचार यंत्रणा कशी राबवायची यासंदर्भात चर्चा करण्यात आली असल्याचे बोलले जात आहे. ज्या जागा शिवसेनेच्या हक्काच्या आहेत, त्या मिळवण्यासाठी शिवसेनेचे प्रयत्न आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed