रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघात केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते नारायण राणे यांचं नाव जवळपास निश्चित मानलं जात आहे. परंतु शिवसेना नेते उदय सामंत आपले बंधू किरण सामंत यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. त्यामुळे भावाला तिकीट मिळावं, यासाठी सामंत प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे. शिवसेनेला ही जागा सोडली, तर मोठ्या मताधिक्याने आपण विजयी होऊ, असा विश्वास उदय सामंत यांनी बैठकीत बोलून दाखवला.
रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातील विद्यमान खासदार विनायक राऊत हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. ठाकरेंनी त्यांना पुन्हा एकदा तिकीट जाहीर केलं आहे. त्यामुळे राऊतांच्या विरोधात राणे मैदानात उतरणार, की ठाकरे विरुद्ध शिंदे अशी लढत होणार, याची उत्सुकता आहे.
दुसरीकडे, पालघरमधील शिवसेनेचे विद्यमान खासदार राजेंद्र गावितच भाजपच्या ‘कमळ’ या निवडणूक चिन्हावरुन लढण्यास उत्सुक असल्याचं बोललं जात आहे. गावित हे २०१९ च्या लोकसभा निवडणुकांवेळी भाजपमधून शिवसेनेत आले होते. युती असतानाही केवळ ती जागा शिवसेनेला सुटल्यामुळे हा मैत्रीपूर्ण पक्षांतराचा घाट घालण्यात आला होता. त्यामुळे आता त्यांची घरवापसी होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, छत्रपती संभाजीनगरची जागा ही शिवसेनेची पारंपारिक जागा असल्याने ती आम्हाला सोडण्यात यावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. या जागेवरुन शिंदेंनी मराठा नेते विनोद पाटील यांचं नाव पुढे करण्यात आलं आहे. असल्याने ती आम्हाला सोडण्यात यावी अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे. तर दुसऱ्या बाजूला भाजपकडून मंत्री भागवत कराड आणि अतुल सावे यांनी दावा केला आहे. त्यामुळे छत्रपती संभाजीनगरच्या जागेचा तिढा कायम आहे.
Read Latest Maharashtra News Updates And Marathi News
आतापर्यंत भाजपने २४, तर शिवसेनेने आठ जागांवर उमेदवार जाहीर केले आहेत. मात्र छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर अजूनही उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. त्यामुळे इथे आपल्यालाच उमेदवारी मिळावी यासाठी भाजपच्या नेत्यांनी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. त्या पार्श्वभूमीवर भागवत कराड आणि अतुल सावे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली.