• Sat. Sep 21st, 2024

Govinda politics career : पाच टर्मच्या विजेत्या भाजपच्या मंत्र्यांचा गड केला होता गोविंदांनी ‘उद्धवस्त’, पण कारकिर्द होती वादग्रस्त

Govinda politics career : पाच टर्मच्या विजेत्या भाजपच्या मंत्र्यांचा गड केला होता गोविंदांनी ‘उद्धवस्त’, पण कारकिर्द होती वादग्रस्त


Actor Govinda And Politics । मुंबई :
अभिनेता गोविंदा यांनी २००८ ला राजकारणाला रामराम ठोकल्यानंतर आता पुन्हा राजकारणाचं शिव’धनुष्य’ पुन्हा हाती घेतले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला आहे. मुंबईतील उत्तर पश्चिम मतदारसंघातून त्याला लोकसभेची उमेदवारी मिळणार आहे. गेल्या आठवड्यात अभिनेता गोविंदा अहुजा याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटी घेतली होती. तेव्हाच त्याच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाले होते. गुरुवारी अखेर त्याने भगवा हाती घेऊन एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली जी जबाबदारी मिळेल, ती निभाविण्याचा निर्धार व्यक्त केला.

उत्तर पश्चिम मतदारसंघासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने अमोल कीर्तीकर यांना उमेदवारी दिली आहे. त्याच वेळी त्यांच्याविरोधात महायुतीकडून कोणत्याही उमेदवाराची घोषणा करण्यात आलेली नव्हती. अखेर आज गोविंदाने बाळासाहेब भवन येथे शिंदे गटात प्रवेश करून निवडणूक लढण्याचे संकेत दिले.
‘गोविंदा’ पुन्हा आला रे! लोकसभेच्या तोंडावर सेकंड इनिंग, काँग्रेस नव्हे ‘या’ पक्षात प्रवेश?

काँग्रेसच्या तिकिटावर खासदार

२००४ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेच्या रिंगणात उतरलेले अभिनेते गोविंदा यांनी केंद्रीय मंत्रिपद भूषवलेल्या राम नाईक यांचा पाच टर्म राखलेला गड खालसा केला होता. जवळपास ५० हजारांचं मताधिक्य मिळवत गोविंदा यांनी राम नाईक यांचा पराभव केला होता. नाईकांना ५ लाख ११ हजार ४९२, तर गोविंदा यांना ५ लाख ५९ हजार ७६३ मतं मिळाली होती.
बॉलिवूड अभिनेते गोविंदा यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश, लोकसभेचे तिकीट मिळणार

संसदेतील अनुपस्थिती

खासदारपदी असताना गोविंदा यांच्याशी संपर्क होत नसल्याचं मतदारसंघातील जनतेचं म्हणणं होतं. संसदेतही त्यांची अनुपस्थिती चर्चेचा विषय ठरली होती. संसदेचे सत्र सुरू असताना त्याला गोविंदा यांनी हजेरी लावली नाही, त्यामुळे पत्रकारांनी त्यावेळी टीकेची झोडही उठवली होती. खासदार असतानाही त्याच काळात गोविंदांनी बॉलिवूडमध्ये पुनरागमन केलं. २००७ मध्ये त्यांचा पार्टनर चित्रपट रिलीज झाला. वर्षभरात गोविंदा यांनी राजकारणाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला. २० जानेवारी २००८ मध्ये गोविंदा यांनी राजकारण सोडून पुन्हा बॉलिवूडमध्ये काम सुरू केले होते. राजकारणात येऊन आपण वेळेचा अपव्यय केला आणि त्याचा फटका आपल्या चित्रपट कारकीर्दीला बसल्याचं वक्तव्यही त्यांनी त्यावेळी केलं होतं. मात्र आता गोविंदा यांनी राजकीय क्षेत्रात पुनरागमन केलं आहे.

खासदार म्हणून गोविंदा यांचे काम

निवडणुकीदरम्यान त्यांनी सांगितले की त्यांचा अजेंडा प्रवासी वाहतूक), आरोग्य आणि शिक्षण असणार आहे. वाहतूक क्षेत्रात, पश्चिम रेल्वे झोनमधील बोरिवली-विरार विभाग चौपदरीकरण करण्याचे 80% श्रेय घेतले. अधिकृत सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रात काही प्रयत्न केले. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी एका मुलाखतीत सांगितले की, गोविंदाने वसई आणि विरारमधील अंगणवाड्या बांधण्यासाठी आणि पिण्याच्या पाण्याची समस्या सोडवण्यासाठी त्यांच्या “स्थानिक क्षेत्र विकास निधी” (सरकारकडून प्रत्येक खासदाराला वाटप होणारा निधी) पैसे दिले होते, परंतु प्रशासकीय मंजुरीला विलंब झाला.

गोविंदा पुन्हा राजकारणात, मुख्यमंत्री शिंदेंकडून ग्रँड ‘वेलकम’

गोविंदांची कौटुंबिक पार्श्वभूमी

गोविंदाचा जन्म मुंबईतील पंजाबी कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अरुण कुमार आहुजा आणि आईचे नाव निर्मला देवी आहे. त्यांनी वसईतील अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयात शिक्षण घेतले. जेथे त्यांनी वाणिज्य शाखेत पदवी पूर्ण केली. गोविंदाचा विवाह सुनीता आहुजासोबत झाला होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed