संजय नाना काकडे असे त्या दिग्गज नेत्याचा नाव असून आज त्यांनी पत्रकार परिषद आपली नाराजी जाहीर पणे व्यक्त केली. संजय काकडे हे देखील खासदारकीसाठी इच्छुक होते. संजय काकडे २०१४ ते १९ पर्यंत राज्यसभेचे खासदार होते. पुण्याच्या राजकारणाचा दांडगा अनुभजव असलेले नेते म्हणून संजय काकडे यांच्याकडे पाहायला जात. अनुभव आणि जनसंपर्क तगडा असल्यामुळे संजय काकडे यांनी पुणे लोकसभावर आपला दावा केला. मात्र पक्षश्रेष्ठींनी मोहोळ याना उमेदवारी जाहीर करून काकडे यांना डावलले आहे. यासाठी भाजपाचे वरिष्ठ नेते रवींद्र चव्हाण यांनी संजय काकडे यांची भेट घेतली.
मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर पक्ष बैठकीत किंवा कोणत्याही कार्यक्रमात संजय काकडे यांची हजेरी नव्हती. त्यामुळे संजय काकडे नाराज आहे अशा चर्चा सुरू झाल्या. दरम्यान त्यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, मी पुणे लोकसभेसाठी इच्छुक होतो हे जग जाहीर आहे. आणि उमेदवारी मिळाली नाही म्हणून नाराज होणे हे देखील स्वाभाविक आहे. काल रवींद्र चव्हाण पुण्यात एका लग्न कार्यसाठी आले होते.मी माझ्या भावना त्यांच्या पुढे मांडल्या आणि वरिष्ठांसमोर बैठकीत याचा विचार केला जाईल असे आश्वासन त्यांनी दिले.
भेटीनंतर नाराजी दूर झाली का? यावर काकडे म्हणाले, भाजपाच्या नेत्यांना उमेदवारी जाहीर केली आहे परंतु आजही ABफॉर्म दिला गेला नाही. २०१९ चा अपवाद पाहता अनिल शिरोळे यांची उमेदवारी रद्द करून दिवंगत खासदार गिरीश बापट यांना उमेदवारी जाहीर केली होती. त्यामुळे स्थानिक पातळीवरच्या परिस्थिती पाहता आणि स्थानिक सर्व्ह नुसार उमेदवार बदलू शकतो. आणि तसे काही असेल तर पुणे शहरात ही असे काही होऊ शकत असा जुना संदर्भ देत, पुणे लोकसभेवर आपला दावा केला.