• Mon. Nov 25th, 2024
    तीव्र वळणाचा अंदाज न आल्यानं कार पलटी, स्थानिक मदतीला आले अन् धक्कादायक वास्तव समोर

    शुबम बोडके, नाशिक : नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात तळंग फाट्यावर तीव्र वळणाचा अंदाज न आल्याने एक चारचाकी वाहनाचा मोठा अपघात घडला. वाहनाचा वेग आणि जागेवर वळण असल्याने हा अपघात घडला असावा अशी स्थानिकांनी प्राथमिक माहिती दिली. मात्र वाहनात कत्तलीसाठी पाच बैल घेऊन जात असल्याची घटना अपघातानंतर समोर आली. हे वाहन रस्त्याच्या बाजूला असलेल्या पाठाच्या चारीत दोन पलटी मारून गेले आणि या वाहनातील तीन बैल हे ठार झाले असून त्यात दोन जनावर हे गंभीर जखमी झाले.दरम्यान, अपघातग्रस्त वाहन हे पाठाच्या सारी पडल्यामुळे मोठ्या प्रमाणात या अपघाताने परिसरात आवाज झाला आणि या परिसरातील नागरिकांनी या आवाजाच्या दिशेने धाव घेतली तर त्या ठिकाणी एका कारचा अपघात झाल्याचा प्रथमदर्शनी त्यांच्या निदर्शनास आले. मात्र घटनास्थळी धाव घेतलेल्या नागरिकांनी या वाहनात जनावरे असल्याचे पाहिले. त्यानंतर तात्काळ नागरिकांनी या अपघातग्रस्त वाहनातून जखमी बैलांना बाहेर काढले. अपघात घडल्यानंतर वाहतूक करणारे हे अंधाराचा फायदा घेऊन त्या ठिकाणाहून पसार झाल्याचे देखील निदर्शनास आले.
    राष्ट्रवादीच्या माजी खासदाराला ठाकरेंकडून उमेदवारी, पवार गटाच्या बैठकीत नेत्यांची नाराजी

    स्थानिकांनी तात्काळ या घटनेची माहिती माजी पोलीस पाटील बिरारी यांना दूरध्वनीद्वारे दिली. सटाणा पोलीस स्टेशनला ही माहिती दिल्यानंतर घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक खैरनार आणि आहेर हे घटनास्थळी दाखल झाले. अपघातग्रस्त वाहनाचा पंचनामा करून जखमी बैलांना स्थानिकांच्या मदतीने पुढील उपचारासाठी सटाणा येथे पाठवण्यात आले. या संदर्भात पुढील तपास सटाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक दत्तात्रेय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शेळके हे करत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

    हा अपघात घडल्यामुळे या परिसरात रात्रीच्या वेळी अवैद्य वाहतूक होत असल्यास देखील निदर्शनास आले. या अपघाताच्या घटनेनं परिसरात खळबळ उडाली आहे. कत्तलीसाठी परिसरात वाहतूक होत असल्याने या घटनेला परिसरात पोलिसांचे रात्रीचे ग्रस्त वाढवण्याची मागणी मात्र स्थानिकांनी पोलिसांना केली आहे. या घटनेमुळे स्थानिक पोलीस देखील अलर्ट मोडवर आल्याचं पाहायला मिळत आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed