• Sat. Sep 21st, 2024
आई-बहिणीचं कसं होईल विचारत मामांच्या मांडीवर सोडला प्राण, भावाला बहिणीने दिला मुखाग्नी

निलेश पाटील, जळगाव : गरीब परीस्थितीतून बाहेर पडण्याची धडपड..लहान बहिणीचं शिक्षण..आणि परिवारासाठी नवीन घर घेण्याचं स्वप्न घेऊन बारामती येथे खासगी कंपनीमध्ये जॉब करणाऱ्या जयेश मराठेचं आज हृदय विकाऱ्याच्या निधन झाले. त्यामुळे संपूर्ण शहरात एकच हळहळ व्यक्त होत आहे. एकुलता एक मुलगा असल्याने बहिणीने स्मशानभुमीत जाऊन मुखाग्नी दिला. जयेश मागील १५ दिवासांपूर्वीच पुणे येथून हॉस्पिटलमधून ब्रेन स्टोनच्या झटक्यातून बरा होऊन नुकताच रावेर स्वगृही परतला होता. परंतू आज सकाळी अचानक छातीत दुखायला लागल्याने हॉस्पिटलमध्ये नेतांना त्याचे निधन झाले.जयेशची अत्यंत गरीबीची परीस्थिती असल्याने तसेच नोकरीच्या शोधात पाच वर्षांपूर्वी वडील सोपान मराठे त्यांची पत्नी उषाबाई मराठे मुलगी खुशी आणि मुलगा जयेश याला घेऊन रावेर शहरात आले होते. आर्थिक चनचनीतून तीन वर्षांपूर्वीच वडील सोपान मराठे यांनी आत्महत्या केली होती. त्यामुळे विधवा आई आणि लहान बहिणीला सांभाळण्याची जबाबदारी जयेश याच्या खांद्यावर आली होती. सर्व जबाबदारी घेऊन जयेश जिवनाचा मार्गक्रम करत होता.
राष्ट्रवादीच्या माजी खासदाराला ठाकरेंकडून उमेदवारी, पवार गटाच्या बैठकीत नेत्यांची नाराजी

कुटुंबाला आर्थिक चनचनमधून बाहेर काढण्यासाठी जयेश बारामती येथे एका खासगी कंपनीमध्ये जॉब करत होता. कुटुंबासाठी नवीन घर घेण्याचं त्याचं स्वप्न होतं. परंतू १५ दिवासांपूर्वी त्याला डोकं दुखण्याचा त्रास जाणवू लागला. त्याच्या कंपनीत काम करणाऱ्या सहकाऱ्यांनी त्याला बारामती आणि तेथून पुणे हॉस्पिटलमध्ये घेऊन गेले. त्याच्या सर्व तपासण्या करण्यात आल्यावर त्याला ब्रेन स्टोन सारखी लक्षणे जाणवली.

त्याची आई, बहीण, मामा हे देखील पुणे येथे हॉस्पिटल येथे गेले आणि तेथे ऑपरेशन केले. यात त्याच्या तब्येतीत सुधार देखील झाला होता. उपचार पूर्ण झाल्यावर दोन दिवासांपूर्वी जयेश हा रावेर येथे त्याच्या आई व लहान बहिणीकडे आला होता. आज सकाळी त्याला छातीत अचानक दुखायला लागले. त्याचे मामा त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असतांना त्याला त्रास अजून जास्त वाढला. शेवटी जयेश याने त्याचे मामा जितु महाजन, योगेश महाजन आणि किशोर महाजन याला म्हणाला ”माझी बहीण व आई यांचं कसं होईल? असं म्हणत जगाचा निरोप घेतला. जयेश याच्या निधनाचे सर्वांकडून एकच हळहळ व्यक्त होत होती.

‘भाच्या’ला वाचवण्यासाठी ‘मामा’च्या प्रयत्नांना अपयश

भाचा जयेश मराठे याला वाचवण्यासाठी त्याचे मामा जितु महाजन, किशोर महाजन आणि योगेश महाजन यांनी पुणे येथील हॉस्पिटलमध्ये शर्तीचे प्रयत्न केले. पुण्याला देखील हॉस्पिटलमध्ये त्याला सौम्य हृदय विकाराचा झटका आला होता. परंतु उपचार वेळेवर मिळाल्याने तो बरा झाला होता. ब्रेनच्या आजारातून बरा होऊन नुकताच रावेरला त्याच्या घरी आला होता. मात्र, आज सकाळी मामा हॉस्पिटला घेऊन जात असताना त्याचे निधन झाले. जयेशची आई मजूरी करून आपले कुटुंब चालवते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed