Beed Crime News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच एक मोठी घटना बीडमधील अंबाजोगाईमध्ये उघडकीस आली आहे. या घटनेनं संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे.
ऊसाच्या सरीमध्ये मृतदेह
अंबाजोगाई तालुक्यातील ममदापूर येथील शेतकरी दिलीप मोतीराम देशमुख यांच्या गावालगत असलेल्या दोन एकर ऊसाला अचानक आग लागली. आज पहाटे साडेपाचच्या सुमारास त्यांच्या सालगड्याने ही माहिती दिली. जेव्हा आग विझवण्याचे प्रयत्न सुरू झाले, तेव्हा ऊसाच्या सरीमध्ये एका व्यक्तीचा बॉडी पूर्णतः जळालेल्या अवस्थेत दिसून आली. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असल्याचे पोलिसांच्यावतीने सांगण्यात आलं आहे.
Pune Crime : सिग्नलवर कार थांबताच खिडकीवर ‘टक-टक’, चालकाचं लक्ष भरकटताच गाडीमध्ये चोरी; पुणे पोलिसांची मोठी कारवाई
वारकरी संप्रदायाशी जोडलेले
मृत विश्वनाथ पांचाळ हे उच्चशिक्षित (M.A.) होते आणि वारकरी संप्रदायाशी जोडलेले होते. मात्र, गेल्या काही काळापासून ते टीबी (क्षयरोग) या आजाराने ग्रस्त होते. या आजारामुळे ते मानसिक तणावात असल्याची चर्चा गावात आहे. आठ दिवसांपूर्वीही त्यांनी स्वतःवर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असे प्राथमिक तपासात समोर आलं असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. विश्वनाथ पांचाळ यांच्या पश्चात दोन मुले, सून आणि एक विवाहित मुलगी असा परिवार आहे.
Solapur Accident: जीवलग मित्र चहा प्यायला गेले, पण भीषण अपघातात जागीच मृत्यू; कारचा चेंदामेंदा, कुटुंबाचा आक्रोशशेतकरी दिलीप देशमुख यांनी या घटनेवर संताप व्यक्त केला आहे. शेजारील शेतकरी सुरेश बुरगे यांनी शेतरस्ता अडवल्यामुळे त्यांचा ऊस कारखान्याला जाऊ शकला नाही. ‘स्ता मोकळा करण्यासाठी तहसीलदारांकडे अर्ज देऊनही प्रशासनाने वेळेत कारवाई केली नाही. रस्ता मिळाला असता तर ऊस आधीच तुटला असता आणि ही दुर्दैवी घटना घडली नसती,’ असं देशमुख यांनी म्हटलं आहे. दरम्यान, ही घटना नेमकी कशामुळे घडली हे अद्याप स्पष्ट झालेनं नाही, मात्र, पांचाळ यांनी आजाराला कंटाळून स्वतःला पेटवून घेतलं असावं, असा प्राथमिक अंदाज आहे. मात्र, मृत्यूचं नेमकं कारण शवविच्छेदन अहवाल आणि पोलीस तपासानंतरच स्पष्ट होईल, अशी माहिती अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी दिली आहे.
