• Mon. Nov 25th, 2024
    दादांची वाट न पाहता सुनेत्रा पवारांनी स्वत:ची उमेदवारी जाहीर केली, म्हणाल्या मी स्वप्नात…

    पुणे : पुण्यातील बारामती लोकसभा मतदार संघामधून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात नेमका कोणता उमेदवार असणार याबाबत कमालीची उत्सुकता लागून राहिली होती. अखेर बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार याच उमेदवार असण्याचे स्पष्ट संकेत खुद्द सुनेत्रा पवार यांनीच दिले आहेत.सुनेत्रा पवार आज बारामती दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी काटेवाडी या गावात ग्रामस्थांशी संवाद साधला. या संवादावेळी त्यांनी लोकसभेची निवडणूक लढवणार असल्याचे स्पष्ट संकेत दिल्याचे पाहायला मिळाले. या संवाद दौऱ्यावेळी सुनेत्रा पवार म्हणाल्या की, ”काटेवाडी करांसाठी आजवर जे काही मी केले, जे मला करावसं वाटलं ते माझ्या स्वतःच्या समाधानासाठी केले आहे. मला कधीही स्वप्न पडलं नव्हतं की, मी कधीतरी निवडणुकीला उभी राहील. कधीतरी तुम्ही मला मतदान द्याल. मी तुमच्यासाठी काम करावं. अशी माझी तुमच्याकडून कधीही अपेक्षा नव्हती. तुम्ही इतके दिवस मला जे प्रेम देत आहे तेच माझ्यासाठी खूप आहे” असं सुनेत्रा पवार यांनी म्हटलं आहे.
    शिर्डीतून बंडखोरी होणार! वाकचौरेंच्या उमेदवारीला स्वकीयांचाच विरोध; उद्धव ठाकरे म्हणाले,आता फैसला साईबाबांवर

    सुनेत्रा पवार पुढे म्हणाल्या की, ”आजवर मी जे काही काटेवाडीसाठी केले आहे. मला आधीच काही स्वप्न पडलेलं नव्हतं किंवा भविष्य माहित नव्हतं की मी उमेदवार असेल आणि त्यामुळेच मी तुमच्यासाठी काम करत आहे. असं वाटून घेऊ नका लोकसभा, विधानसभांच्या निवडणुका दर पाच वर्षांनी होतच असतात. मात्र यंदाची निवडणूक ही वेगळी आहे. मला माहित आहे की, सध्या अनेकांना वेगवेगळे प्रश्न आहेत. असे असले तरी काटेवाडीकरांना नेमकं माहिती आहे की, आपणाला कोणाबरोबर राहायचं आहे. काटेवाडीकरांना माहिती आहे की, आपल्यासाठी काय भलं आहे आणि काय बुरं आहे. याबाबत तुम्हाला जास्त फोड करून सांगण्याची मला आवश्यकता वाटत नाही. शेवटी तुम्ही सगळे माझ्या कुटुंबातीलच माणसं आहात.. फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं आहे की, घड्याळ तेच आहे फक्त वेळ नवी आहे. तुमच्याच पाठींब्याशी गरज आहे”, असं आवाहन तर सुनेत्रा पवारांनी जनतेला केलं.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed