• Sat. Sep 21st, 2024
सुनील केदार यांचा विरोधकांना थेट इशारा, म्हणाले- पुढल्या वेळेस जर मी बाहेर आलो तर मग…

नागपूर: माझ्यावर सातत्याने हल्ले होत आहेत. अधिकाऱ्यांच्या माध्यमातून मला गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पुढच्या वेळेस सुनील केदारवर वार कराल तर मला फाशी द्यायची असाच सोडायचा नाही. पुढल्या वेळेस जर मी बाहेर आलो तर मग मात्र तुमच्या घराघरात जाऊन हा तुमचे हाल करेन, असं वक्तव्य माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुनील केदार यांनी बुधवारी रामटेक लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या आमदार रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिल्यानंतर आयोजित सभेत केलं आहे.
भुजबळांच्या उमेदवारीच्या चर्चेने शिंदेंच्या शिवसेनेत अस्वस्थता, शिवसैनिक नाशिकहून मुंबईच्या दिशेने रवाना
आपल्या भाषणादरम्यान केदार यांनी विरोधकांसह भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. सध्याची लोकसभा निवडणूक ही विचारधारेची लढाई असल्याचे सांगून केदार म्हणाले, “निवडणुकीच्या वेळी माझ्यावर विरोधकांकडून प्रत्येक प्रकारे वार केले जात आहेत. अधिकाऱ्यांच्या माध्यमातून हे वार केले जात आहेत. पण मी दोघांसमोरही झुकलो नाही, ना आत्ता झुकणार आहे. सत्ताधारी सत्ता असे वावरत आहे, जसं काय अमरपट्टा घेऊन आले आहे. ते विसरूनच गेले या देशावर राज्य करणारे ब्रिटिशांवर जेव्हा सामान्य माणूस उठून उभा झाला होता, तेव्हा ब्रिटिशांना आपल्या गोळ्या आणि बंदुक घेऊन हा देश सोडावा लागला.विरोधकांना इशारा देताना काँग्रेस नेते म्हणाले की, वेळप्रसंगी ते लोक माझ्यावर अजूनही आघात करतील. मी शेतकरी कुटुंबातला आहे मी घाबरणारा व्यक्ती नाही. जे पेरले तेच उगवेल. तुम्ही ज्या बेईमानांना घेऊन चालले आहेत, जिस दिन मेरी चक्की चलेगी ना” भाजपला माहिती आहे त्यांचा उमेदवार निवडून येत नाही. त्यांनी भगोडा माणूस उभा केला आहे. त्यापेक्षा स्वतःच्या पक्षाचा उमेदवार उभा केला असता, असेही केदार म्हणाले.

जरांगेंनी अशोक चव्हाणांसोबत डील केल्याचा अजय महाराज बारसकरांचा आरोप

पुढे बोलताना केदार म्हणाले, आता दिवस बदलणार आहेत. पूर्ण वेळ हिवाळा राहत नाही, पूर्णवेळ पावसाळाही राहत नाही पूर्णवेळ उन्हाळाही राहत नाही, ऋतू बदलते तर परिस्थिती बदलायला काही वेळ लागत नाही आणि देशाच्या वातावरण पूर्ण बदललेलं आहे. “घाबरण्याचे कारण नाही, कारण मी घाबरत नाही. माझ्यावर हल्ला करण्यापेक्षा मला फासावर चढवलेले बरे, हे सत्ताधाऱ्यांनी लक्षात ठेवावे, “पुढच्या वेळेस सुनील केदारवर वार कराल तर मला फाशी द्यायची, असा सोडायचा नाही. पुढल्या वेळेस जर मी बाहेर आलो तर मग मात्र तुमच्या घराघरात जाऊन हा तुमच्या हाल करेल.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed