• Mon. Nov 25th, 2024
    वंचित स्वतंत्र लढल्यास महाविकास आणि महायुतीला फटका बसणार – धनंजय महाडिक

    कोल्हापूर : गत लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने आपली निर्णायक ताकद दाखवून दिली आहे. वंचित बहुजन आघाडीला अदखलपात्र करता येणार नाही. यामुळेच येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला असून याचा फटका महायुतीसह महाविकास आघाडीलाही बसणार असल्याचे मत भाजप राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी व्यक्त केलं आहे. तसेच लोकसभा निवडणुकीत राज्यात काँग्रेसचा एकही खासदार निवडून येणार नसल्याचेही महाडिक यावेळी म्हणाले आहेत. ते आज कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते शिवराज सिंह चौहान यांनी नुकताच कोल्हापूरचा दौरा केला होता. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जिल्ह्यातील दोन्हींपैकी एक लोकसभा मतदारसंघ भाजपला मिळावा अशा भावना व्यक्त केल्या होत्या. हातकणंगले आणि कोल्हापूर लोकसभेबाबत अद्याप अजून कोणतीही माहिती आम्हाला आलेल्या नाहीत. सोलापूरात दोन वेळा भाजपचे खासदार निवडून आले होते. सातारामध्ये उदयनराजे निवडून आले होते. सांगलीत संजय काका पाटील दोन वेळा निवडून आले होते. यामुळे कोल्हापुर जिल्ह्यात भाजपचा खासदार करायचा असेल तर एक जागा पक्षाकडे असायला हवी. त्यामुळेच हातकणंगले मधून शौमिका महाडिक यांना जर आदेश दिला तर आमची तयारी असल्याचे खासदार महाडिक यावेळी म्हणाले.
    अंतर्गत विरोध डावलला, बच्चू कडूंचंही ऐकलं नाही, भाजपकडून नवनीत राणा यांना उमेदवारी

    काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत सोडून यात्रा काढली. मात्र ज्या राज्यात ही यात्रा गेली त्या राज्यातील काँग्रेस पक्षात फूट पडली. केंद्रात १० वर्ष मोदी सरकार आहे. मात्र एकाही मंत्र्यावर भ्रष्टाचाराचे आरोप झालेले नाहीत. जेव्हा देशात काँग्रेसचे सरकार होतं तेव्हा अनेक मोठे घोटाळे उघडकीस आल्याचं महाडिक यावेळी म्हणाले. भाजपकडून अबकी बार ४०० पार चा नारा दिला जात आहे. मात्र विरोधक संविधान बदलण्यासाठी ४०० पारचा नारा भाजप देत असल्याची टीका करत आहे. याला उत्तर देताना महाडिक म्हणाले, देशाची घटना बदलणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुद्धा शक्य नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या करिश्मासमोर विरोधक फिके पडत आहेत. मराठा आंदोलन म्हणून जरांगे पाटील यांनी जी मागणी केली होती. ती मागणी मुख्यमंत्र्यांनी मान्य केली आहे. मराठा आरक्षणसंदर्भात कार्यवाही सुरु असून जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत उमेदवार उभा करू नयेत, असं आवाहनही महाडिक यांनी यावेळी केलं.

    लोकसभा निवडणुकीत पश्चिम महाराष्ट्रातील महायुती उमेदवारांच्या प्रचारार्थ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सहभाग घेण्याचे नियोजन प्रदेश भाजप करत असून याबाबत लवकरच घोषणा करण्यात येईल. तसेच भाजपकडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर करण्यात आली असून यामध्येही राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या नावाची स्टार प्रचारक म्हणून निवड करण्यात आली आहे.

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *