• Sat. Sep 21st, 2024
भाजपने त्यांचं काम केलं, आम्ही आमचं करू, राणांचा प्रचार करणार नाही, बच्चू कडू संतापले

मुंबई : स्वकीयांचा आणि मित्रपक्षांचा विरोध झुगारून भारतीय जनता पक्षाने अमरावतीच्या विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी दिल्याने राणा यांचे विरोधक संतप्त झाले आहेत. शिवसेना शिंदे गटाचे आनंदराव अडसूळ यांनी राणांविरोधात पर्यायाने भाजपविरोधात आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर इकडे प्रहारचे अध्यक्ष आमदार बच्चू कडू यांनीही राणांच्या उमेदवाराला विरोध दर्शवत भाजपने त्यांचे काम केले, आम्ही आमचं करू, राणांचा प्रचार करणार नाही असे उघडपणे सांगत भाजपला थेटपणे इशारा दिला.गेल्या काही दिवसांपासून अमरावती लोकसभेच्या जागेवरून महायुतीत महाभारत रंगले होते. माजी खासदार आनंदराव अडसूळ आणि बच्चू कडूंनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन राणा यांच्या उमेदवारीला विरोध केला होता. मात्र तो विरोध डावलून भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे अडसूळ आणि बच्चू कडू यांनी राणांविरोधात दंड थोपटले आहेत.
नवनीत राणांना तिकीट दिलं, तर महायुतीबाहेर पडण्याची परवानगी द्या, बच्चू कडूंचा शिंदेंना इशारा

अमरावतीच्या जागेवर खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आल्याने बच्चू कडू यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एवढंच नाही तर नवनीत राणा यांना तिकीट दिल्याने राणांना आपला विरोध कायम असल्याचे सांगत त्यांचा प्रचार करणार नसल्याचे बच्चू कडू यांनी उघडपणे सांगितले आहे.
अंतर्गत विरोध डावलला, बच्चू कडूंचंही ऐकलं नाही, भाजपकडून नवनीत राणा यांना उमेदवारी

बच्चू कडू यांनी सांगितले की, भाजपने नवनीत राणा यांना उमेदवारी देऊन त्यांचं काम केलं आहे. पण आता आम्ही आमचं काम करू. नवनीत राणा यांनी कार्यकर्त्यांना दिलेल्या वागणुकीमुळे आम्ही त्यांचे काम करू शकत नाहीत. जर आम्ही राणांचं काम केलं तर आमचा पक्ष फुटेल. जर प्रहारच राहणार नसेल तर आम्ही राणांचे काम कसे करू? त्यापेक्षा आम्ही युतीतून बाहेर पडणं पसंत करू. त्याचीच परवानगी काल रात्री आम्ही मुख्यमंत्र्यांकडे केली, असेही बच्चू कडू यांनी सांगितले.

काल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ४ तारखेला बैठक घेण्याचं आश्वासन दिलं होतं. मात्र त्यानंतरही आज भाजपने नवनीत राणा यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आम्ही अपक्ष निवडणूक लढू, असे बच्चू कडू म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed