• Sat. Sep 21st, 2024

विद्यार्थिनींची पाण्यासाठी पायपीट, भर उन्हात करावी लागतेय वणवण; मुलींच्या शिक्षणाचा खेळखंडोबा

विद्यार्थिनींची पाण्यासाठी पायपीट, भर उन्हात करावी लागतेय वणवण; मुलींच्या शिक्षणाचा खेळखंडोबा

म. टा. वृत्तसेवा, जव्हार : जव्हार तालुक्यातील आदिवासी आणि दुर्गम भागांतील विद्यार्थिनींसाठी गोरठण गावात सुसज्ज इमारत बांधून निवासी शिक्षणाची सोय करण्यात आली. मात्र, येथे पाण्याची सुविधा नसल्याने या विद्यार्थिनींना भर उन्हात पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.

जव्हार तालुक्यातील अनेक गावांत तीव्र पाणीटंचाई आहे. पाणीटंचाईचे चटके विद्यार्थ्यांनाही सोसावे लागत आहेत. शाळा सोडून भर उन्हात पाण्यासाठी वणवण करण्याची वेळ विद्यार्थ्यांवर आली आहे. गोरठण येथे कस्तुरबा गांधी बालिका निवासी विद्यालयातील ३०० आदिवासी विद्यार्थिनींना शिक्षण सोडून पाण्यासाठी भटकावे लागत आहे.
भरधाव कारची बाईकला धडक, पती-पत्नीचा जागीच मृत्यू; गावकऱ्यांचे डोळे पाणावले
दरम्यान, पालघर जिल्हा परिषदेने निवासी शाळेसाठी स्वतंत्र पाणी योजना मंजूर केली. मे २०२३मध्ये कामाचा कार्यारंभ आदेशही दिला. ग्रामपंचायत गोरठणच्या मालकीच्या जलस्वराज्य योजनेतून २००७मध्ये बांधण्यात आलेली जुनी विहीर पाडून तिथेच नवीन विहीर बांधण्याचे ठरले होते. परंतु, गावातील काही व्यक्तींनी या कामास विरोध केल्याने हे काम आजतागायत सुरू झालेले नाही. त्यामुळे आदिवासी विद्यार्थिनींना हक्काच्या पाण्यापासून वंचित राहावे लागत आहे.

गेल्या महिन्यात दूषित पाण्यामुळे शाळेतील १५-१६ आदिवासी विद्यार्थिनींना उलट्या व जुलाबचा त्रास झाला होता. त्यामुळे शासनाने आदिवासी मुलींच्या जिवाशी न खेळता पाणी योजना तातडीने मार्गी लावावी, अशी मागणी पालकांनी केली आहे.
आधी एकत्र दारु प्यायले, नंतर वादाला तोंड फुटलं, वाडीत भरदिवसा गुन्हेगाराला निर्घृणपणे संपवलं
शिक्षणाचा खेळखंडोबा
मुलींच्या वसतिगृहात पाणीच येत नसल्याने, त्यांना शिक्षण सोडून पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. विद्यालय आणि वसतिगृहात पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी यासाठी येथील शिक्षकांनी जिल्हा परिषद व पाणीपुरवठा विभागाकडे पाठपुरावा केला. मात्र, मंजूर पाणी योजनेच्या विहिरीसाठी जागा मिळत नसल्याने मुलींच्या शिक्षणाचा खेळखंडोबा सुरू आहे.

माझी मुलगी कस्तुरबा गांधी बालिका निवासी विद्यालयात शिक्षण घेत आहे. मात्र, तिथे पाणी आणण्यासाठी विद्यार्थिनींना जावे लागते. त्यामुळे त्यांची शाळ बुडतेच, पण अनेक विद्यार्थिनींच्या पायाला दुखापत झाली आहे. सरकारने येथील पाणीप्रश्न तातडीने सोडवावा, अशी विनंती पालक के. धामोडा यांनी केली आहे.

तहानलेल्या गावासाठी बळीराजाचा मोठेपणा; सिंचनाच्या पाण्याने भागवली गावकऱ्यांची तहान

गोरठण येथील कस्तुरबा गांधी बालिका निवासी विद्यालयातील साधारण ३०० आदिवासी मुली प्रशिक्षण घेत आहेत. येथे पाणी व्यवस्था व्हावी म्हणून प्रशासकीय स्तरावर प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती डी. एस. चित्ते, गट विकास अधिकारी, जव्हार यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed