• Sat. Sep 21st, 2024
प्रणिती शिंदेंसमोर नवं आव्हान, MIMचा उमेदवार दंड थोपटणार, मतांची विभागणी होण्याची शक्यता

सोलापूर: सोलापूर लोकसभा मतदारसंघात नवा ट्विस्ट समोर आला आहे. एमआयएमच्या विश्वनिय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सोलापूर लोकसभा मतदारसंघात एमआयएम पक्षाकडे तीन दलित उमेदवारांनी उमेदवारीसाठी अर्ज केला आहे. तीन उमेदवारांची नावे हैदराबाद येथील पार्टी मुख्यालयात पाठवण्यात आले आहे. तिघांमधील एका उमेदवाराला तिकीट मिळणार आहे. एमआयएम पार्टीचे प्रमुख ओवेसी हे रोजा इफ्तार पार्टीसाठी लवकरच सोलापुरात येणार असून त्यावेळी सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या एमआयएमच्या उमेदवाराची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.
अकोला लोकसभा मतदारसंघात भाजपमध्ये बंडखोरी? प्रमोद पोहरे अपक्ष अर्ज दाखल करणार
२०१९ साली झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत वंचित आणि एमआयएमचे उमेदवार डॉ. प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे सुशीलकुमार शिंदे यांचा पराभव झाला होता. वंचितचे प्रकाश आंबेडकर हे महाविकास आघाडीत जातील की नाही याबाबत अजून चित्र स्पष्ट झाले नाही. वंचितसोबत येऊ दे किंवा नाही, मात्र एमआयएमचा उमेदवार सोलापूर लोकसभा मतदारसंघात नशीब आजमावणार आहे. प्रणिती शिंदे आणि राम सातपुते दोघात लढत होईल, असे चित्र असताना एमआयएमचा उमेदवार आल्यास निवडणुकीचा खेळ रंगणार आहे.एमआयएमचे सोलापूर प्रमुख फारूक शाब्दी यांनी एका स्थानिक वृत्तपत्राला माहिती देताना सांगितले की, एमआयएम पहिल्यांदाच सोलापूर लोकसभा मतदारसंघात स्वबळावर लढण्याच्या तयारीत आहे. तीन दलित उमेदवारांनी पक्षाकडे अर्ज केला असून पक्षश्रेष्ठींकडे अर्ज पाठवले आहेत. पक्षातील वरिष्ठांशी बोलून लवकरच उमेदवार घोषित होईल, अशी माहिती फारूक शाब्दी यांनी स्थानिक दैनिकाला दिली आहे.

शिवतारे वैफल्यग्रस्त, या निवडणुकीत त्यांचं डिपॉजिटही वाचणार नाही | अमोल मिटकरी

२०१९ मध्ये झालेल्या लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत मुस्लिम आणि दलित मतांचा विभाजन झाले होते. याचा फटका थेट काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे यांना बसला होता. २०१४ मध्ये देखील एमआयएम पक्षाचा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आल्यास पुन्हा एकदा मुस्लिम आणि दलित मतांचे विभाजन होणार आहे. प्रणिती शिंदे यांच्या समोर राम सातपुते यांचे कडवे आव्हान असताना पुन्हा एक नवीन आव्हान दारापर्यंत आले आहे. मुस्लिम मतदान आकर्षित करण्यासाठी सुशीलकुमार शिंदे आणि प्रणिती शिंदे वेगवेगळ्या इफ्तार पार्टीत सहभागी होत आहेत. एमआयएमचा उमेदवार आल्यास प्रणिती शिंदेंना मानणारा मुस्लिम मतदार अलगदपणे एमआयएमच्या पारड्यात जाईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed