• Sat. Sep 21st, 2024

मावळचा तिढा सुटेना, महायुतीचा उमेदवार धनुष्यबाण नाही तर कमळ चिन्हावरच लढणार, चर्चांना उधाण

मावळचा तिढा सुटेना, महायुतीचा उमेदवार धनुष्यबाण नाही तर कमळ चिन्हावरच लढणार, चर्चांना उधाण

म. टा. वृत्तसेवा, पुणे: मावळ लोकसभा मतदारसंघात अद्याप कोणत्याही पक्षाकडून उमेदवाराची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. परंतु भाजपने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इतर सर्व पक्षांपेक्षा जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. शिवसेनेच्या वाट्याला असलेली ही जागा शिवसेनेचा उमेदवार धनुष्यबाणाऐवजी कमळ चिन्हावर लढवेल, अशी जोरदार चर्चा सुरू आहे. भाजप, राष्ट्रवादीच्या तुलनेत कमी झालेली शिवसेनेची ताकद या चर्चेमागील कारण असल्याचे बोलले जात आहे.मावळ लोकसभा मतदारसंघात रायगड आणि पुणे जिल्ह्यांतील प्रत्येकी तीन विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे. यापैकी पनवेल, उरण, चिंचवड या तीन मतदारसंघांत भाजप, पिंपरी आणि मावळ मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), कर्जत मतदारसंघात एकमेव शिवसेनेच्या शिंदे समर्थक आमदार अशी ताकद आहे. भाजपचे तीन आमदार असल्यामुळे या मतदारसंघांतून भाजपचा उमेदवार असावा, अशी चर्चा सुरुवातीला होती. आजवर भाजपने कमळ चिन्हावर येथे उमेदवार उभा केलेला नाही. देशात ४०० पेक्षा जास्त खासदार निवडून आणण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नात मावळ मतदारसंघातून भाजपचा खासदार असावा, अशी इच्छा भाजपचे निरीक्षक प्रमोद सावंत यांच्यासमोर कार्यकर्त्यांनी बोलून दाखवली होती. परंतु महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी आपण प्रयत्न करायचे आहेत, असे सांगून कार्यकर्त्यांच्या मागणीला बगल दिली. मात्र शिवसेना आपला मित्रपक्ष आहे, त्यांच्या वाट्याला ही जागा असल्यामुळे आपल्याला त्यांचा प्रचार करावा लागेल, अशी ठोस भूमिका घेतली नव्हती.

हेमंत गोडसेंच्या उमेदवारीला विरोध, नाशिक लोकसभेसाठी कोणाची लॉटरी लागणार? महायुतीत रस्सीखेच

भाजपच्या खासदारांची यादी जाहीर होऊ लागल्यानंतर राज्यातील काही मतदारसंघांतील जागावाटपावरून वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू आहे. पुण्याचे माजी महापौर संजोग वाघेरे यांना शिवसेना उद्धव गटाने उमेदवारी दिली आहे. केवळ औपचारिकता बाकी असल्याचे बोलले जात आहे. उद्धव ठाकरेंच्या बाजूने असलेली सहानुभूतीची लाट, तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे जाणाऱ्या खासदारांबद्दल मतदारांमध्ये असलेली नाराजीचा फटका शिवसेनेला बसू शकतो, म्हणून बारणे स्वतः २०२४ची निवडणूक धोका न पत्करता कमळ चिन्हावर लढविण्याच्या मानसिकतेत असल्याचे बोलले जात आहे. पनवेलमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर बारणे यांनी ‘मी शिवसेनेचा उमेदवार आहे’ असे म्हणण्यापेक्षा ‘मी महायुतीचा उमेदवार आहे,’ असे सांगून गोंधळ वाढविला होता. त्यामुळे या चर्चांना ऊत आला आहे.

शिवतारेंनी दादांची माफी मागावी अन्यथा मावळात गाठू, अजितदादांच्या शिलेदाराचा थेट इशारा

‘मंगळवारी चित्र स्पष्ट होईल’

शिवसेनेचा उमेदवार कमळाच्या चिन्हावर उभा राहील का, या चर्चांना मंगळवारी पूर्णविराम मिळेल, अशी प्रतिक्रिया बारणे यांनी दिली. चिन्ह कोणते असेल, याचे उत्तर मात्र त्यांनी दिले नाही. त्यामुळे या चर्चांमध्ये तथ्य आहे का, अशी शंका निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed